सेक्स करणं ही नैसर्गिक ऊर्मी मानली जाते. जशी आपल्याला भूक किंवा तहान लागते तशीच आपल्याला सेक्सची गरज वाटू शकते असं मानलं जातं. मात्र अन्न आणि पाण्यासारखं सेक्स जीवनावश्यक आहे का? तर त्याचं उत्तर नाही असं देता येईल. एखाद्या मुलाने किंवा मुलीने सेक्स करायचं नाही असं ठरवलं तर ती काही मरण पावणार नाही.
समाजामध्ये लैंगिक संबंधांची इच्छा किंवा कोणत्याही प्रकारची लैंगिक इच्छा नसणारी माणसंही असतात. आणि त्यात काहीही चुकीचं, कमी, वाईट नाही हे आवर्जून लक्षात घ्या. लैंगिक इच्छा निर्माणच होत नाही तरी त्यात काही चूक नाही. लैंगिक इच्छा निर्माण होते पण लैंगिक संबंध ठेवायचे नाहीत असं कुणी ठरवलं तरी तो ज्याचा त्याचा किंवा जिचा तिचा प्रश्न आहे. सेक्स करायला कुणी आडकाठी आणू शकत नाही तसंच सेक्स करायलाच पाहिजे असंही बंधन कुणी घालू शकत नाही. आणि एकमेकांशी मैत्री, दोस्ती, बंधुता ही नाती काय कमी मोलाची आहेत का? केवळ सेक्समुळेच जवळीक निर्माण होते असं काही नाही.
त्यामुळे आपल्या आयुष्यात आपण काय करायचं आणि ते बरोबर का चूक हे ठरवण्याचा अधिकारही आपलाच आहे. दुसऱ्या कुणाचाही नाही.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा