1 उत्तर

प्रत्येकाचा संभोग करण्याचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. त्यामुळं कालावधी किती वाढवायचा? हे कसं ठरणार. साधारणपणे प्रत्यक्ष संभोगाचा कालावधी ३ ते ५ मिनिट असतो. परंतू अनेक पुरुषांना पॉर्न क्लिप्स किंवा खोट्या ऐकीव माहितीमधून संभोगाचा कालावधीबाबत गैरसमज तयार होतात. संभोगापूर्वी करायचा प्रणय हा प्रत्यक्ष संभोगासाठी खूप फायदेशीर असतो. ज्याला इंग्रजीमध्ये फोरप्ले म्हणतात. फोरप्लेमध्ये देखील लैंगिक आनंद मिळवता येतो.

दुसरं महत्वाचं म्हणजे, संभोग करणं ही मानसिक आणि शारीरिक सुख देणारी गोष्ट आहे. संभोग करताना शरीराच्या हालचाली होतात त्यामुळं थकवा येणं नैसर्गिक आहे. जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर तुमचं शरीर सुदृढ असल्यामुळं लैंगिक आसानांचा(सेक्स पोजिशन) जास्त वापर करुनही लैंगिक सुख मिळवू शकता.

आपले उत्तर प्रविष्ट करा

5 + 2 =