असा एखादा अभ्यास माझ्या वाचण्यात नाही. मी एवढं म्हणू शकेन की मुखमैथुन हा भारतीय परंपरेला नवा प्रकार नसला तरी प्रचलित व्यवस्थेत तो विशेषतः स्त्रियांकडून अव्हेरला जाताना दिसतो. लैंगिकतेसारख्या विषयावर काम करताना जे अनुभवाला येतं त्यावरून तर हा निष्कर्ष काढावा लागतो की आपल्या इथे लैंगिक आनंद मिळवण्याचा हा प्रकार फारसा प्रिय नाही. पण तरीही बरेचदा पुरुष जोडीदारांकडून त्याची मागणी केली जाते आणि बळजबरीचा सामना स्त्रियांना करावा लागतो. आपल्या इथली नातेसंबंधातील स्त्री-पुरुष सत्ता विभागणी पाहता स्त्रियांना अशा कृतीला नाखुशीने सामोरं जावं लागतं. पण ही एक प्रकारची हिंसाच आहे. त्यामुळे जिथे अशा प्रकारची अनिच्छा दर्शविली जाते तिथे त्याची बळजबरी केली जाऊ नये. अन्यथा त्यात काही गैर नाही.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा