lingatun satat pani asked 5 years ago

Mi aani mazi girlfriend 2 varsh sahvasat aahe. ti pahili mazya mitit yet nase pan aata ti mitit yevun kiss pan dete tehi faar dirghkal (fakt sanbhogh hot nahi) . mazya lingatun tevha hi pani yayach aatahi yet pan aata tar jastch yayal. hastmaithun tar mi karatoch twice week pan kiman 1 mahina zala mazya lingatun tichya vichareane kinva phone chating ne sudhha lingatun pani yet. mala thodisi bhiti vatate ki satat pani padlyamule tabyetivar farak tar padnar nahi na tyamule shariratale calaries kami hot nahi na. sakali utlya pasun te ratri zope pryant lingatun tichya vicharane pane yet rahat. pan jevha pani padat tevha asshi kahi feeling yet nahi aani smjat hi nahi ki pani padal aahe. mala thodi far bhiti vatat aahe. please guide kara.

1 उत्तर
Answer for lingatun satat pani answered 5 years ago

मित्रा, तुझी अडचण लक्षात येतेय. तुमच्या प्रश्नावरुन एक गोष्ट परत परत दिसते आहे की, तुम्ही सतत लैंगिक विचारात आहात. अन लैंगिक विचार मनात आल्यामुळे तुम्हाला हा त्रास होत असावा. मैत्रिणीशी बोलताना, ति आठवल्यावर लैंगिक विचार सोबत येत असावा. अन लैंगिक विचार मनात आल्यावर असं होणं सहाजिक आहे.

काही उपाय ही तुमच्या पातळीवर करुन पाहू शकता.

अ) आपला व्यतिरिक्तचा वेळ स्वत:च्या आवडत्या कार्यात गुंतवला पाहिजे. उदा. छंद, स्पर्धा, खेळ, सामूहिक काम, इ.

आ) नव नवीन गटात सहभागी व्हा, तरुण – तरुणींच्या संमिश्र गटामध्ये निकोप, खेळकर वातावरण असतं. सर्वांगीण विकास व्हायला असे गट उपयोगी ठरतात. एवढंच नव्हे तर निकोप व जबाबदार अशा सहजीवनाचा आनंद मिळतो व लैंगिक ताण कमी प्रमाणात जाणवतात, असा सर्वांचा अनुभवही आहे.

तेव्हा लैंगिक विचार कमी करा अन तुमचं मन इतर बाबीत गुंतवा. एक लक्षात घ्या. सेक्स किंवा लैंगिक भावना वाईट नाहीत. अनावर लैंगिक भावना मात्र वेळीच ओळखली पाहिजे, त्यावर उपाय केला पाहिजे.

सगळ्यात महत्वाचं:

तुम्हाला जर खूपच त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांना भेटून घेणं उचित होईल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 19 =