प्रश्नोत्तरेmaja lagnala 3varsh jhale ahet ani amhi 2vrshyapasun praytn karit ahot mul hot nahi ani sex kelyanantar majhe virya yoni madhun lagech baher padate tyasathi please kahitari upay sanga please please

**

1 उत्तर

असं म्हणतात की पुरुषाच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला हजारो पुरुष बीजं तयार होतात. आणि त्यातलं एकच गर्भधारणेसाठी पुरेसं असतं! वीर्य योनिमधून बाहेर आलं तरी थोडंतरी आत जाणारच. सेक्स केल्यानंतर काही वीर्य स्त्रीच्या योनिबाहेर येऊ शकते पण त्यामुळे मुल होत नाही किंवा गर्भधारणा होत नाही हा गैरसमज आहे.
पाळी चक्रातील काही ठराविक दिवसांमध्येच गर्भधारणा होऊ शकते. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो. त्यामुळे आपल्याला आपल्या पाळी चक्रातला अंडोत्सर्जनाचा काळ ओळखता आला तर त्यानुसार गर्भधारणेसाठी किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. गर्भधारणा नक्की कशी होते हे समजून घेण्यासाठी https://letstalksexuality.com/conception/ या लिंक वरील लेख वाचा.
गर्भधारणेसाठी पूरक असणाऱ्या काळात संबध ठेवूनही अनेक महिने मुल होत नसेल तर योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. बऱ्याचदा आपल्या समाजात मुल होत नसेल तर स्त्रीलाच जबाबदार धरले जाते मात्र हे चुकीचे आहे. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की गर्भधारणेसाठी स्त्री आणि पुरुष या दोघांचाही संबंध असतो. त्यामुळे दोघांसाठीही वैद्यकीय सल्ला आवश्यक आहे. गर्भधारणेसाठी पूरक असणाऱ्या काळात संभोग केल्यानेदेखील गर्भधारणा होत नसेल तर अवश्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या वेबसाईटवर याविषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत ते नक्की वाचा. खाली लिंक दिली आहे.
https://letstalksexuality.com/questions-2/

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 2 =