शुक्राणूंची संख्या कमी आहे हे तुम्हाला नक्की कसं कळलं? यासाठी तुम्ही कुठे तपासणी केली आहे का? शिवाय वीर्य पातळ आहे म्हणजे नक्की काय हे समजू शकलेलं नाही. वीर्य पातळ असल्यामुळं शुक्राणूंची संख्या कमी असते असा तर्क बांधणे चुकीचं आहे. तेव्हा जर तुम्ही तपासणी न करता शुक्राणू कमी आहेत असा अंदाज बांधत असाल तर तर तो चुकीचा ठरु शकतो.
आता अपत्यप्राप्तीबद्दल बोलू या. अपत्य न होणं याला अनेक कारणं असू शकतात. जसं वीर्यातील शुक्राणूंची संख्या कमी असणं, शुक्राणू कमजोर असणं, स्त्रीबीज न येणं, स्त्रीबीज किंवा पुरुषबीजांचं मीलन न होणं, गर्भाशयाचे आजार असणं इत्यादी अनेक कारणं असू शकतात. अपत्य नक्की का होत नाही याच्या विश्लेषणासाठी तज्ञ डॉक्टरांची मदत घ्या. ते जास्त फायदेशीर राहील.