माणसाने म्हणजे नक्की कोणी हे तुमच्या प्रश्नामधून कळालं नाही. स्त्री आणि पुरुष दोघेही हस्तमैथुन करु शकतात किंवा करतात. हस्तमैथुन केल्यामुळं लैंगिक परमोच्च क्षणाचा आनंद मिळू शकतो. परमोच्च क्षणाच्यावेळी पुरुषांच्या लिंगातून वीर्यपतन होत तर स्त्रीयांच्या योनीतून वीर्यासारखा कोणताही स्त्राव येत नाही परंतू परमोच्च आनंद मिळतो. हस्तमैथुन ही एक सुरक्षित लैंगिक कृती आहे. यामध्ये दोन जोडीदांची गरज नसते. हे मात्र नेहमी लक्षात ठेवा, सतत मनामध्ये सेक्सबद्दल विचार येत असतील आणि हस्तमैथुन करत असाल तर मानसिक आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या दैनंदिन कामामध्ये अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा