होय. काही मानसिक व शारीरिक आजारांमुळे व काही औषधांमुळे वीर्यपतन आणि एकूणच लैंगिक अनुभवावर प्रभाव पडू शकतो. बऱ्याचदा पेशंट अशा गोष्टी डॉक्टरजवळ कशा बोलायच्या म्हणून डॉक्टरांशी बोलत नाहीत आणि अनेक वेळा डॉक्टरही, औषधांच्या लैंगिक दुष्परिणामांची कल्पना देत नाहीत. एखादं औषध किंवा एखादा आजार आपल्याला लैंगिक दुष्परिणाम दाखवत असेल तर डॉक्टरांकडे याबद्दल मोकळेपणाने बोलायला शिकले पाहिजे. लाजायचं आजीबात कारण नाही.
बिंदुमाधव खिरे यांच्या ‘मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख’ या पुस्तकातील ‘आजार आणि औषधं’ या प्रकरणामध्ये याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. सदर पुस्तक रसिक साहित्य, साधना ग्रंथ प्रदर्शन, शनिवार पेठ, मॅजीस्टीक बुक स्टोअर, पुणे यासाठी विक्रीसाठी उपलब्ध आहे.