प्रश्नोत्तरेMe vayacya 14 varsha pasun hastmaithun karat ahe majhe ling taath jhale tari hi khalcya bajula jhukle ahe me ling saral honya sathi kay karu upay sanga

2 उत्तर

खरंतर हस्तमैथुन आणि लिंग वाकडे होण्याचा काहीही संबंध नाही. हस्तमैथुनाविषयी आपल्या समाजात अनेक समज- गैरसमज आढळतात त्यातीलच हा एक.

हस्तमैथुन करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. हस्तमैथुन केल्याने पुढे जाऊन मुल होत नाही हाही एक गैरसमज आहे. हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही.

आता राहिला प्रश्न लिंग वाकडे असण्याचा. लिंगातील वाकडेपणा हा बऱ्याच पुरुषांना सतावणारा प्रश्न असतो परंतु नैसर्गिकरित्या सर्वच पुरुषांच्या लिंगाला थोड्या फार प्रमाणात बाक असतो. फार थोड्या पुरुषाचं लिंग अगदी सरळ असतं. या बाकामुळे संबंधांच्या वेळी काही अडचण येत नाही किंवा गर्भधारणा होण्यासाठीही अडचण येत नाही. परंतु संभोग करताना जर का वेदना होत असतील तर डॉक्टरचा सल्ला घेणं योग्य ठरेल. क्वचित केसेस मध्ये लिंगाचा वाकडेपणा खूप जास्त वाढलेला दिसतो व त्यामुळे लिंगाला योनीत किंवा गुदद्वारात प्रवेश करताना अडचण येते. शस्त्रक्रिया करून किंवा मेडिकल उपकरणांचा वापर करून लिंगाचा बाक कमी करता येऊ शकतो. फार काही त्रास होत नसेल तर काळजी करू नका. व्यक्ती तितक्या प्रकृती.

आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 2 =