शिश्न योनीत पूर्ण न जाण्यामागे खूप वेगवेगळी कारणे असू शकतात. जोडीदाराची संभोग करण्याची पहिलीच वेळ असणे, योनीपटलाचे (Hymen) विच्छेदन झालेले नसणे, हे ही कारण असू शकते.
लिंगप्रवेशी संबंधात अनेकदा घर्षणातून वेदना होतात. खरंतर योनी मार्गातून येणाऱ्या स्त्रावांमुळे संबंध सुखकर होत असतात. पण इच्छा नसणे, पुरेशी उत्तेजना न मिळणे या कारणामुळे हे स्त्राव तयार होत नाहीत आणि वेदना होतात. आनंददायी लैंगिक संबंधासाठी खाजगी जागा, निवांतपणा, स्वच्छता, इच्छा, तणावरहित मन, प्रेम, पुरेशी जवळीकता या अत्यावश्यक गोष्टीसोबतच फोर प्ले (जवळ घेणे, चुंबन, बातचीत, स्पर्श, मिठी ई) ह्या घटकांना कमालीचे महत्व आहे. तसेच संभोगाच्या कृती बदलून पहा. योनी स्त्राव तयार व्हायला अडचण येत असल्यास water base lube वापरुन पहा. अन तरीही जर होणारा त्रास कमी नाही झाला तर डॉक्टर किंवा स्त्रीरोगतज्ञांना भेटणं हेच उत्तम.