प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsmaz way 28 ahe etar mulan chy linga kade pahun mala ase wat te ki maze ling khup lhan ahe tasech mi jar wyam kela kinw kahi ag mehnathichi kame keli tar lingacha akar ha purwi pexa kupch lahan zalela asto wa maz daway bajuchy jghet nehami wedan hot astat upaya sanga.

mi 28 warshacha ahe etar mulanchy linga kade pahun mala ase wat te ki maze ling khup lhan ahe tasech mi jar wyam kela kinw kahi ang mehnathichi kame keli tar lingacha akar ha purwi pexa kupch lahan zalela asto wa mazy daway bajuchy jghet nehami wedan hot astat tasech mal jasth grdi aslely jagewar lagwi jorach lagawli tari lagawi hot nahi upaya sanga.

1 उत्तर

मित्रा, तुझा प्रश्न महत्वाचा आहे. लिंगाच्या आकाराबद्दल अनेक मुलांच्या मनामध्ये न्यूनगंड असतो. अगदी तुझ्यासारखा दिसणारा दुसरा कोणी मुलगा तुला आत्तापर्यंत भेटला आहे का? किंवा अगदी स्वभावानं, रंगानं आणि अंगानं सारख्याच असणार्या दोन व्यक्ती तू पाहिल्या आहेत का? जर उत्तर नाही असेल तर हे समजून घे की प्रत्येकजण वेगळा आहे. प्रत्येकाच्या शरीराची बांधणी वेगळी आहे. शरीराची बांधणी तुमच्या अनुवांशिक गुणसूत्रांनुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार बदलत असते. त्यामुळं कोणाचं लिंग लहान मोठं असणं यात तुझा नक्कीच काही दोष नाही. हे लक्षात घे, लिंगाच्या आकाराबाबत कोणतही शास्त्रीय प्रमाण नाही. दुसरं महत्वाचं म्हणजे लिंगाचा आकार आणि लैंगिक सुख यांचा काही संबंध नाही. लैंगिक सुखाचा आनंद घेण्यासाठी इतरही काही गोष्टी महत्वाच्या असतात. त्यामुळं लिंगाच्या आकाराबद्दल न्यूनगंड किंवा गैरसमज मनातून काढून टाक.

आता तू विचारलेल्या दुसर्या प्रश्नाकडं वळू या. ज्यावेळी लैंगिक भावना उद्यपित होतात त्यावेळी लिंगामध्ये रक्तप्रवाह वाढून लिंगामध्ये ताठरता येते. ज्यावेळी लैंगिक भावना उद्यपित नसतात त्यावेळी लिंगाचा आकार कमीच असतो. हा काही आजार नाही. मात्र तुमच्या जांघेमध्ये जो त्रास होत आहे त्याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बरा.

bhaurao d jadhav replied 8 years ago

thanks, pan mala nashik madhil ykhady do. cha add dy.

I सोच replied 8 years ago

प्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो,
आजपर्यंत आपण वेबसाईटच्या माध्यमातून संवाद साधला. आता ‘लेट्स सोच- एक नया नजरिया’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला प्रत्यक्ष भेटता येईल. आपणा सर्वांना या कार्यक्रमाचं आग्रहाचं निमंत्रण. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा https://letstalksexuality.com/lets-soch-ek-naya-nazaria/

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 14 =