तुम्हाला तुमच्या डॉक्टरचा, स्त्री रोग तज्ञाचा सल्ला घ्यावा लागेल. ते तुम्हाला एखाद्या विशेषज्ञाकडे पाठवतील. कधीकधी एखादे साधन (उदा.डायलेटर) वापरून योनीमुख रुंद करता येऊ शकते. किंवा गरज असेल तर डॉक्टर एखादी लहान शस्त्रक्रिया सुचवू शकतात. ते एखादे स्नायू मधील तणाव घालवण्यास मदत करणारे एखादे औषध किंवा जेल सुचवू शकतात.
गर्भधारणा होण्यासाठी पुरुष बीज स्त्रीबिजापर्यंत पोचणे आवश्यक आहे. त्यासाठी काय करावे लागेल हे डॉक्टर तुम्हाला सांगतील.
मुख्य म्हणजे योनिप्रवेशी लैंगिक संबंधांची सक्ती तुम्हीही आपल्या जोडीदारावर करू नका असा आमचा सल्ला असेल. संभोगाच्या वेळी दुखते म्हणून योनीचे स्नायू आवळून घेतले जाण्याची शक्यता आसते. पण त्यातून परत वेदना वाढतात. तुमच्या जोडीदाराशी बोला. संवाद वाढवा. त्यांना या सर्व गोष्टीचे टेन्शन अधिक असणार. तो तणाव कमी करा. कदाचित संबंध सुखकर होतील. या गोष्टीमुळे शरीर संबंध, प्रेम करणं थांबवू नका. लैंगिक आनंद मिळवण्यासाठी अनके मार्ग (हस्तमैथुन, मुखमैथुन) आहेत. डॉक्टरांचा सल्ला मात्र अवश्य घ्या.