प्रश्नोत्तरेCategory: Private QuestionMi 3 varshapurvi preganant hote ..

Mi 3 varshapurvi preganant hote ..mi sade char mahinyachi preganant hote…maz abortion he normal dilivery hote tas zal….mazi yonichi jaga tyamule mothi zali ahe….ata maz lgn Nov madhe ahe ani mala bhiti ahe ki he mazya life partner chya lksht yeyil..mala ashi mahiti milali ahe ki yoni chi jaga kmi karnyasathi tablet aste….he khar ahe ka?? Ani asel tr plz mala nav sanga…tyache parinam pn sanga…plz lvkr sanga maz lgn agdi 2 mhinyavr ahe..plzzzz

1 उत्तर

कोणत्याही स्त्री-पुरुषाने केलेला संभोग हा इतर लोकांना फक्त पाहण्यावरुन कळत नाही. तुम्ही यापूर्वी केलेला संभोग तुमच्या जोडीदाराला फक्त योनी पाहून कळणार नाही. आधी मनातील ही भिती काढून टाका. बाळंतपण किंवा अबोर्शन झाल्यानंतर योनी पुन्हा तिचा मूळ आकार घेते. कदाचित (हो कदाचितच) सैलपणा जाणवत असला तरी संभोग करताना त्याचा काहीही परिणाम होत नाही किंवा तो लक्षात येण्यासारखा नसतो. बाजारात आज व्हजायना टायटनिंग क्रिम उपलब्ध आहेत मात्र त्यांच्या गुणवत्ता आणि परिणांमाबाबत अधिक माहिती उपलब्ध नाही. ही औषधं वापरताना तुमचं आरोग्य सर्वात जास्त महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा. तुमचा जोडीदार तुम्हाला किती समजून घेतो यावरुन तुम्ही जोडीदाराशी कधी? किती? काय़? बोलायचं हे ठरु शकता. जोडीदार तुमच्याशी ’योनी’साठी लग्न करत आहे की तुमच्यातील ’व्यक्तीमत्वाचे पैलू’ पाहून हे जर तुम्हाला ओळखता आलं तर नात्यामध्ये जास्त स्पष्टता येईल. जोडीदाराशी बोलून तुमच्या मनातील भिती दूर होणार असेल तर जोडीदाराशी नक्की बोला. कदाचित यातून तुमचं नातं अधिक घट्ट होईल. हे नेहमी लक्षता ठेवा तुमच्या शरीरावर तुमचा हक्क आहे. तुम्हाला ज्या गोष्टी नाही पटत त्या स्पष्टपणे मांडा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 17 =