प्रश्नोत्तरेmi 7/8 y ahstmaithon karat ahe
mi 7/8 y ahstmaithon karat ahe asked 7 years ago

sir mi 22y cha ahe ..mi 7/8 y ahstmaithon karat ahe ..mi 2 vela sex karyla gelo pn 1:15min lagych viry padath ahe ….tymule atta mala llaj vath ahe …ithon pudy mala broblem hoil yachi bhite vathe ..aani tatharta kami zali ahe tasech maze ling pn barik ahe …sir mazay vait savaichi mala mala laaj vath ahe ..plj sir maza broblem soal kara

1 उत्तर

मित्रा, तुला काही प्रोब्लेमच नाही त्यामुळे सॉल्व करण्याचा प्रश्नच येत नाही. निश्चिंत राहा. तुला कोणतीही वाईट सवय नाही त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा स्वतःची लाज वाटून घेणं, अपराधी वाटून घेणं बंद कर. तुझ्या प्रश्नातील काही गैरसमाजांविषयी बोलूयात. काही तथ्य आणि शास्त्रीय माहिती जाणून घेतली म्हणजे तुझ्या मनातील भीती आपोआपच कमी होईल.

१. लैंगिक इच्छा होणं आणि हस्तमैथुन करणं अगदी नैसर्गिक आहे त्यात काहीही गैर नाही. हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे. शिवाय हस्तमैथुनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत होते. हस्तमैथुन केल्याने काहीही दुष्परिणाम होत नाहीत. हस्तमैथुन केल्याने लिंगामध्ये ताठरता येण्यास काहीही अडचण येत नाही. आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘लेख’, ‘FAQ – शंका समाधान’ तसेच ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

लेख- https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

२. मित्रा, सेक्स ही काही लढाई किंवा जंग नाही की जिंकायलाच पाहिजे आणि तेही पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नांत. सेक्स, लैंगिक संबंध हे एकमेकांच्या आनंदासाठी करायचे असतात त्याचा एवढा ताण, दबाव, प्रेशर मनावर ठेऊ नकोस. सगळ्यात पहिल्यांदा तुझ्या मनातील भीती काढून टाक. हेच तुझ्या सर्व प्रश्नांचे सोल्युशन आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा सेक्स करताना ताठरता आली नाही म्हणजे पुढे कधीच येणार नाही, हा गैरसमज मनातून काढून टाक.

३. आता आपण हे समजून घेऊया की पुरुषांच्या लिंगात ताठरपणा येतो म्हणजे काय होतं. लैंगिक उत्तेजना मिळाल्यामुळे मेंदू अशा वेळी रक्ताचा प्रवाह लिंगाच्या दिशेने वाढवतो आणि त्या प्रवाहाच्या दाबामुळे लिंगात ताठरता येते. परंतु या प्रक्रियेवर त्या त्या व्यक्तीचं शारीरिक स्वास्थ्य, मनस्वास्थ्य, वय इत्यादीचा प्रभाव असतो. वयानुसार पुरुषांमध्ये कार्यरत असलेल्या टेस्टेरॉन या विशिष्ट सम्प्रेरकाचे प्रमाण ही कमी होत जाते ज्यामुळे लैंगिक उत्तेजनही कमी होत जाते आणि हे नैसर्गिक किंवा स्वाभाविक आहे. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य असेल, ताणताणाव असतील तर अशा स्थितीतही शरीर संबंधांप्रति अनिछा, अल्पकालीन ताठरता, वीर्य लवकर बाहेर येणे अशा स्थितीचा सामना करावा लागतो. लिंग शिथिलतेचा प्रश्न हा अनेक पुरुषांना भेडसावत असतो. जर यामुळे लैंगिक सुख अनुभवण्यास त्रास होत असेल तर त्याला आपण समस्या म्हणू शकतो यामुळे दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते. सेक्सविषयी भीती किंवा अति आतुरता, कामाचा किंवा इतर प्रकारचा ताण, लैंगिक संबंधाचा आधीचा अनुभव फारसा आनंददायी नसेल तर त्यामुळेही असा त्रास होऊ शकतो होऊ शकतो. काही वेळा काही शारीरिक आजारही कारणीभूत ठरतात. यासाठी सेक्सची सवय झाली की हळू हळू यावर ताबा येतो. रिलॅक्सेशन पद्धतींचा उपयोग होऊ शकतो. सेक्स आणि संभोगाबद्दलची चिंता, दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग होईल. तसंच ऑरगॅझम कधी येतो, त्याआधी शरीरात, मनात काय संवेदना निर्माण होतात याचं निरीक्षण करा. त्या क्षणी समागमाचा वेग थोडा मंदावण्याचा प्रयत्न केला तर लवकर वीर्य बाहेर येणार नाही. यासाठी जोडीदाराचं सहकार्य आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे एकमेकांशी संवादही तितकाच महत्त्वाचा आहे.वैद्यकीय मदत, सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला आणि काही वेळा औषधांचा उपयोग होऊ शकतो. न घाबरता आणि न लाजता आपली समस्या डॉक्टरांना सांगा. दोन्ही जोडीदारांनी दोषारोप न करता एकमेकांना समजून घेतलं, सेक्स सोडून एरवीही जवळीक वाढवली, धीर दिला तर त्याचा परिणाम निश्चित चांगला होऊ शकेल.

अधिक माहितीसाठी https://letstalksexuality.com/premature-ejaculation/ हा लेख तसेच आपल्या वेबसाईटवरील या समस्येसंबंधित प्रश्न उत्तरे नक्की वाच.

संभोगाच्या काही पध्दती बदलून शीघ्रपतनाची समस्या दूर केली जाऊ शकते. याबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

चिंता सोड आणि निश्चिंत राहा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 11 =