प्रश्नोत्तरेmi aka mulibrobr sex kele aahe pn aata tiche lgn dusry mulasi jale aahe aata prt mi tila sex kela tr hiv hoil ka

1 उत्तर

तुमचा प्रश्न “मी ‘एक्स’ व्यक्तीशी संबंध ठेवला तर आजार होईल का ?” एवढ्यापुरता मर्यादित नसून त्याला अनेक भावनिक आणि सामाजिक पैलू आहेत त्याचा तुम्ही विचार करावा असे वाटते.

१. तुमच्या मैत्रिणीची तुमच्यासोबत लैंगिक संबध ठेवण्याची इच्छा, संमती आहे का? तुम्ही कोणाची फसवणूक तर करत नाही ना?

२. उघड आहे तुमचे हे संबंध तुम्ही जगासमोर स्वीकारण्याच्या स्थितीत नसणार आहात. ते लपवावे लागतील. कारण आपल्या समाजात ते स्वीकारले जाण्याची शक्यता नाही. असे संबध जर उघडकीस आले तर त्यातून तयार होणाऱ्या अडचणींना/ गुंतागुंतीला सामोरं जाण्याची तुमची तयारी आहे का? त्यावेळी दोघांची एकमेकांना साथ असेल का? निर्णय काहीही घ्या पण त्याच्या परिणामांची जाणीव ठेवा आणि जबाबदारीही घ्या. त्यापासून पळून जाऊ नका किंवा माझा काही संबंध नाही असं नंतर म्हणू नका. कारण बहुतेक वेळेस पुरुषासाठी हे सोपं असू शकतं, बाईसाठी नाही…

३. या लैंगिक संबंधांमुळे तुमच्या मैत्रिणीच्या वैवाहिक नात्यामध्ये गुंतागुंत वाढू शकते.

४. दुसऱ्याच्या बायकोसोबत लैंगिक संबध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे.

तुमच्या “मी ‘एक्स’ व्यक्तीशी संबंध ठेवला तर एड्स होईल का ?” या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यास…तुम्हाला ज्या व्यक्तीसोबत सेक्स करायचा आहे त्या व्यक्तीला जर एड्स किंवा लैंगिक संबंधांतून पसरणारा आजार असेल तर तुम्हालाही आजार होऊ शकतो. लैंगिक संबंधांतून पसरणाऱ्या आजाराविषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://letstalksexuality.com/category/sexual-health/.

एच. आय. व्ही./ एड्स विषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपल्या वेबसाईटवर एच. आय. व्ही./ एड्स विषयीचे अनेक प्रश्न चर्चिले आहेत ती ‘प्रश्नोत्तरे’ जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 18 =