mi garodar ahe ka? asked 8 years ago

mala may madhe 8 tarkhela date aleli.tynantr parat alech nahi date.mg mi garodar ahe ka?

1 उत्तर

तुम्ही सांगितल्यानुसार, तुम्हाला मे महिन्यामध्ये म्हणजेच आता जवळजवळ दोन- तीन महिन्यांपूर्वी पाळी आली होती. यादरम्यान तुमचे असुरक्षित म्हणजेच गर्भनिरोधक न वापरता लैंगिक संबंध आले असतील तर प्रेग्नन्सी आहे की नाही याची खात्री करा. मेडिकलच्या दुकानात प्रेग्नन्सी कीट मिळते त्यावरील दिलेल्या सूचनांनुसार प्रेग्नसी आहे की नाही हे पाहता येईल. प्रेगा टेस्ट केल्या नंतरही डॉक्टर कडून प्रेग्नंसी कन्फर्म केलेली योग्य.
गरोदरपणाव्यतिरिक्त पाळी चुकण्याची किंवा लांबण्याची इतरही अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात.
आपण थोडं विस्ताराने समजून घेऊ यात. पाळी चक्रामध्ये अंडोत्सर्जन ही महत्त्वाची घटना आहे. पाळी ही त्या मानाने दुय्यम घटना आहे. अंडोत्सर्जन म्हणजे बीजकोषातून स्त्री बीज बाहेर येणे. दर पाळी चक्रामध्ये ठराविक कालावधीमध्ये स्त्री बीज बीज कोषातून बाहेर येतं. त्याचं पुरुष बीजाशी मिलन झालं तर गर्भधारणा होते. मात्र तसं काही झालं नाही तर साधारणपणे अंजोत्सर्जनानंतर १२-१६ दिवसांनी पाळी येते. त्यामुळे अंडोत्सर्जन जर नियमितपणे होत असेल तर पाळीही नियमितपणे येते.
काही वेळा आजारी असल्यामुळे औषधं चालू असतात त्याचा परिणाम पाळी चक्रावर होतो. अंडोत्सर्जन लांबतं आणि त्यामुळे पाळीदेखील उशीरा येते. काही वेळा अंडोत्सर्जंन होण्यामध्ये काही समस्या असल्यास पाळी नियमित येत नाही. वर म्हटल्याप्रमाणे कसलं टेन्शन असेल, मानसिक ताण असेल तरी पाळी लांबू शकते. खूप प्रवास, दगदग यांचाही पाळी चक्रावर परिणाम होत असतो.
अधिक माहितीसाठी – https://letstalksexuality.com/menstrual-and-fertilitycycle/  आणि https://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/  हे वाचा. काही मदत लागल्यास संपर्क करा.
टेन्शन घेण्याचं कारण नाही. मात्र पाळी नियमित न येण्याचं कारण शोधणं गरजेचं असतं. तत्काळ एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्या. आपल्या शरीराविषयी आपणच जास्त जागरूक होणं आवश्यक आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 3 =