ज्यावेळी मुलींना पाळी येणं चालू होतं त्या सुरुवातीच्या काळात पाळी अनियमित येते. मात्र एक-दोन वर्षातच पाळी नियमित येणं चालू होतं. तसंच पाळी बंद होण्याच्या काळामध्येदेखील ती अनियमित होवू शकते. पाळी येण्याचा काळ प्रत्येक स्त्रीसाठी वेगळा असू शकतो. जसं काहींना दर २० दिवसांनी तर काहीजणींना प्रत्येक ४५ दिवसांनी पाळी येते. कधी कधी हे दिवस मानसिक किंवा शारीरिक तणावामुळे कमी जास्त होवू शकतात.
तुमची पाळी नियमित किती दिवसांनी येते हे प्रश्नांमधून कळत नाहीये. गर्भधरणेची शक्यता वाटत असेल तर बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या प्रेगेनेन्सी टेस्ट कीटचा वापर करुन तपासणी करता येईल. यापैकी काही कारण नसेल तर डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटून त्यांचा सल्ला फायदेशीर राहील.