I mean mule tyanche ling mage pudhe halawtat….tr muli kay krtat…..mulana maithun kelyane kinchit thakwa janavto tsa mulinnahi janavto ka…..?
हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे.शिवाय हस्तमैथुनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत होते. शरीरातील लैंगिकदृष्ट्या संवेदनशील अवयवांना स्पर्श करून मुली हस्तमैथुन करतात. मुलींच्या लैंगिक अवयवांमध्ये क्लिटोरिस नावाचा एक अवयव असतो. लघवीच्या किंवा शूच्या जागेच्या थोडा वर या अवयवाचं टोक असतं. याला हात लावला, इतर वस्तूंनी त्याला स्पर्श केला किंवा क्लिटोरिस घासलं गेलं तर लैंगिक उत्तेजना निर्माण होते. मुलींमध्ये स्तनाग्रंदेखील अतिशय संवेदनशील असतात. स्तनाग्रांना स्पर्श केल्याने देखील लैंगिक उत्तेजना आणि सुख मिळते.
स्त्रिया किंवा मुली हस्तमैथुन करताना क्लिटोरिसला स्पर्श करून सुख मिळवू शकतात. हस्तमैथुनानंतर किंवा संभोगानंतर थोडाफार आणि तात्पुरता थकवा जाणवू शकतो पण त्यात काळजी करण्यासारखे काहीही नाही.
याविषयी अधिक माहितीसाठी वेबसाईटवरील खालील लिंक वरील मजकूर वाचा. https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/