त्यासाठी अगोदर एकमेकांची चांगली ओळख करून घ्या. बोला. एकमेकांच्या आवडी निवडी जाणून घ्या. घाईची आवश्यकता नाही. शरीर संबंध, गर्भधारणा, निरोधन ह्या बद्दल दोघांनी मिळून माहिती मिळवा, एकमेकांना सांगा, विचारा. मूल कधी हवे आहे, हवे की नको, कुटुंब नियोजन या मुद्द्यांवर एकमेकांची मतं जाणून घ्या, त्यांचा आदर करा. बरेचदा लग्नाच्या काही महिन्यातच दिवस गेल्याचे कळते आणि मग लोकांचे चिडवणे, मनस्ताप, निराशा, करिअरची चिंता असे अनेक विषय एकदाच समोर येतात. तसे व्हायचे नको असेल तर नियोजन करा. गर्भ निरोधानावर सल्ला घ्या.
पहिला वाहिला अनुभव महत्वाचा असतो. दीर्घकाल लक्षात राहतो. तो चांगल्या अर्थाने स्मरणात रहावा असे वाटत असेल तर वरील मुद्द्यावर अंमलबजावणी करा आणि अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..
https://letstalksexuality.com/question/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%87/
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा