तुम्ही तुमचं वय कळवलं असतं तर योग्य झालं असतं. पाळी अनियमित असल्यामागे अनेक कारणं आहेत. ताण-तणाव, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामं, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणं पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात.
सामान्यपणे मासिक पाळीचे चक्र २८ ते ३० दिवसांचे असते. प्रत्येकासाठी हे चक्राचा कालावधी वेगवेगळा देखील असू शकतो. स्त्रीला गंभीर अॅनिमिया असेल, औषधोपचार सुरु असतील किंवा प्रंचड ताणाखाली ती वावरत असेल तर या चक्रात फरक पडू शकतो. नियमित असणाऱ्या पाळीत खंड किंवा अंतर पडू शकतं. मात्र, मासिक पाळी २१ दिवसाच्या आत किंवा ३५ दिवसानंतर येत असेल तर एखाद्या आजाराची लागण किंवा संसर्ग झाला आहे का? हे पाहणे गरजेचे आहे. यासाठी आपण स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आजाराचे योग्य निदान करण्यासाठी अवश्य असणाऱ्या टेस्ट किंवा सोनोग्राफी करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रश्नात आपल्या वयाचा उल्लेख नाही. पण आपण ३० वर्षे किंवा त्यापुढील असाल तर ‘ प्याप सिम्यर टेस्ट’ करून घ्यावी असे सुचवावेसे वाटते. ही अगदी साधी आणि सोपी टेस्ट आहे. ज्यामुळे गंभीर आजार असेल तर निदान होण्यासाठी नक्कीच मदत होवू शकते.
आपण थोडं विस्ताराने समजून घेऊ यात. पाळी चक्रामध्ये अंडोत्सर्जन ही महत्त्वाची घटना आहे. पाळी ही त्या मानाने दुय्यम घटना आहे. अंडोत्सर्जन म्हणजे बीजकोषातून स्त्री बीज बाहेर येणे. दर पाळी चक्रामध्ये ठराविक कालावधीमध्ये स्त्री बीज बीज कोषातून बाहेर येतं. त्याचं पुरुष बीजाशी मिलन झालं तर गर्भधारणा होते. मात्र तसं काही झालं नाही तर साधारणपणे अंजोत्सर्जनानंतर १२-१६ दिवसांनी पाळी येते. त्यामुळे अंडोत्सर्जन जर नियमितपणे होत असेल तर पाळीही नियमितपणे येते.
अधिक माहितीसाठी – https://letstalksexuality.com/menstrual-and-fertilitycycle आणि https://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/ हे वाचा. काही मदत लागल्यास संपर्क करा.
आवाहन
तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने काही प्रमाणात तरी तुमचे शंका निरसन झाले असावे अशी आशा आहे. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावे आणि लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं, प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली आहे. एका वर्षातच आपल्या या वेबसाईटला २ लाखापेक्षा अधिक ‘हिट्स’ मिळाल्या आहेत. शिवाय आपल्या ‘प्रशउत्तरे’ या मंचावर रोज दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. प्रश्नकर्त्याविषयीची गोपनीयता हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपली वेबसाईट लोकप्रिय असण्या मागचे प्रमुख कारण आहे.
तुम्हाला आमचा प्रयत्न उपयोगी वाटतो का? तुम्ही या वेबसाईटबद्दल इतरांना सांगाल का? ही वेबसाईट आणखी चांगली कशी करता येईल? काय नाही आवडलं? या आणि अशा मुद्यांवर तुम्हाला आमच्याशी बोलायला आवडेल का? प्लीज तुम्ही आम्हाला लिहून कळवा किंवा मोबाईलचा वापर करून आपलं मत ऑडिओ किंवा व्हिडीओ रुपात रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता. तुमची ओळख गोपनीय राखली जाईल ही खात्री बाळगा. आपले बहुमूल्य मत आम्हाला tathapi@gmail.com या ई मेल वर अथवा या 9545555670 व्हाट्स अप क्रमांकावर जरूर पाठवा.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा