मासिक पाळीच्या किती दिवस आधी किंवा नंतर सेक्स करावा या कल्पना आता बाद व्हायला लागल्या आहेत. कंडोम किंवा इतर गर्भनिरोधकांच्या मदतीने नको असणारी गर्भधारणा सहज टाळता येते. शिवाय कोणत्या काळात गर्भधारणा होणार नाही याचा अंदाज बांधणं अवघड असतं. कारण प्रत्येक बाईच्या शरीरातील अंडोत्सर्जन क्रिया नक्की केव्हा घडेल हे सांगणं सोप्पं नाही. पाळीच्या काळामध्ये सेक्स केला तरी काही समस्या नसते. मात्र मासिक पाळीच्या काळामध्ये लिंग सांसंर्गिक आजार होणाच्या धोका जास्त असतो. शिवाय काही महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान काही शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागतं त्यामुळं अशावेळी संभोग टाळणं ठिक राहतं.
संभोग(सेक्स) करणं ही मनाला आणि शरीराला आनंद देणारी कृती आहे. त्यामुळं तो केव्हा करावा हे प्रत्येकानं ठरवणं योग्य असतं. मात्र त्यामध्ये दोघांचीही संमंती असणं गरजेचं आहे.