पाळीचक्रामध्ये दोन क्रिया महत्वाच्या असतात. पहिली क्रिया म्हणजे अंडोत्सर्जन आणि दुसरी मासिक पाळी येणं. मासिक पाळी येण्याच्या १२ ते १६ दिवस आगोदर अंडोत्सर्जन होत असतं. यालाच स्त्रीबीज असं म्हणतात. स्त्रीबीज बीजनलिकेत १२ ते २४ तास जिवंत राहतं. जर स्त्रीबीजासोबत पुरुषबीजाचं मिलन झालं तर गर्भ राहण्याची शक्यता असते.
रक्तस्त्राव सुरु झाल्यावर पाळी चालू झाली जसं कळू शकतं तसं अंडोत्सर्जन झालेलं सहजासहजी कळत नाही. त्यामुळं नक्की कोणत्या दिवशी अंडोत्सर्जन झालं असेल हे सांगणं कठिण असतं. शिवाय प्रत्येक स्त्रीचं मासिक पाळीचक्र देखील वेगवेगळं असतं. स्त्रीचं मासिक पाळी चक्र नियमित असेल तर काही अंदाज बांधता येवू शकतात. परंतू त्यातून गर्भ राहण्याची शक्यता असू शकते.
आज बाजारामध्ये अनेक गर्भनिरोधके सहजपणे उपलब्ध आहेत. यांचा वापर करणं नेहमीच फायदेशीर राहतं.