लिंगाची जाडी, लांबी आणि आकार यात व्यक्ती परत्वे फरक असतो. सर्वसाधारणपणे उत्तेजित/ ताठरता आलेल्या लिंगाची लांबी ३- ५ इंच असते. शात्रीयदृष्ट्या सागायचे झाले तर गर्भधारणेसाठी लिंग योनीत जाऊन त्यात शुक्राणू पोहचण्याइतपत पुरेसे लांब असावे. एका वीर्याच्या थेंबामध्ये हजारो शुक्राणू असतात आणि गर्भधारणेसाठी एक शुक्राणू पुरेसा असतो. उत्तेजित लिंग जर ३-५ इंचापेक्षाही कमी असेल तर मात्र ही समस्या असू शकते यासाठी तुम्ही योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. अन्यथा काळजी करण्याचे काहीही कारण नाही. लिंग लहान आहे की मोठे यापेक्षा संबंधाच्या वेळी ते ताठ राहते का ? तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला लैंगिक सुख मिळते का? हे जास्त महत्वाचं आहे. लिंगाचा आकार, लांबी आणि लैंगिक समाधान, याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. बहुतेक वेळा मर्दानगी आणि जोडीदाराचे समाधान करण्याची क्षमता यांचा संबध लिंगाचा आकार आणि लांबी यांच्याशी लावतात. पण हा गैरसमज आहे. सेक्स मध्ये लिंगाचा आकार नाही तर आनंद महत्वाचा असतो. सेक्समध्ये प्रत्यक्ष संभोगाबरोबरच प्रणय, स्पर्श, शारीरिक जवळीक आणि संभोग अशा विविध प्रकारच्या लैंगिक क्रियांचा समावेश होतो. यातून जोडीदार परस्परांना आनंद देऊ शकतात. लिंगाचा आकार आणि लैंगिक समाधान हा विषय प्रश्न उत्तरांमध्ये अनेकदा चर्चिला आहे. अधिक माहितीसाठी यासंबंधी प्रश्नउत्तरे अवश्य वाचा.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा