Mi ek 17 varshachi mulgi aahe mala ajun pn period aale nahi t tr kahi upay aahe ka maz Rahniman mulan sarkh aahe krupya samadhan kara?
भारतासारख्या उष्णकटीबंधीय देशात मुलींना सर्वसाधारणपणे वयाच्या १४ ते १५ वर्षांपर्यंत मासिक पाळी येते. पण बऱ्याचदा मुलींचे समाजात असणारे दुय्यम स्थान तसेच मुलींमध्ये मोठ्या प्रमाणावर असणारे कुपोषण आणि अॅनिमिया (शरीरात रक्ताची असणारी कमतरता) यामुळे पाळी येणं लांबू शकतं. पण १६ – १७ वर्षापर्यंत पाळी येणं अपेक्षित आहे. जर येत नसेल तर मात्र तू लवकरात लवकर स्त्रीरोगतज्ञांना भेटणे आवश्यक आहे. राहणीमान मुलांसारखे आहे यातून तुला नेमकं काय म्हणायचं आहे याचा खुलासा होत नाही.