पॉर्न क्लिप्समधून काही लैंगिक कृती अतिरंजित दाखवल्या जातात. जसं २० ते २५ मिनिटं संभोग चालतो, प्रत्येकवेळी स्त्रीच्या ओरडण्याचा आवाज येतो किंवा जास्तीत जास्त योनी गोऱ्या रंगाच्या इत्यादी. या सर्व गोष्टी प्रत्यक्षात असतील असं नाही. पॉर्न इंडस्ट्रीमध्येही तेच दाखवलं जातं ज्यातून त्यांना जास्त नफा कमवता येईल. त्यामुळं पॉर्न पहावं की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो.
संभोग करणं ही एक जबाबदार कृती आहे, याची जाणीव असणं जास्त महत्वाचं आहे. ज्या व्यक्ती लैंगिक संबंधांमध्ये सहभागी आहेत त्यांच्या संमंतीचा प्रश्न प्राथमिक असला पाहिजे. जबरदस्तीने मिळवलेली संमती ही अत्याचाराच्या प्रकारातच मोडते. याबद्दल अधिक लिहित नाही. अशा चित्रपटांमध्ये लैंगिक संबंध हिंसक पद्धतीने चित्रित केलेले असतात. अनेकदा त्यामध्ये लैंगिक संबंधांबद्दल अवास्तव अशा कृती दाखवलेल्या असतात. त्यातून बऱ्याचदा लैंगिक संबंधांबद्दल, सेक्सबद्दल विकृत स्वरुपाची किंवा अवाजवी अशा कल्पना तयार होऊ शकतात आणि प्रत्यक्षात आपल्या जोडीदाराकडून तशा संबंधांची मागणी होऊ लागते. अशी जबरदस्ती मात्र गैर आहे. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवावी की, कॅमेरा व संगणक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काहीही तयार होऊ शकतं त्यामुळे दिखावे पे मत जाओ अपनी अकल लगाओ.
पोर्नोग्राफी विषयाच्या वेगेवेगळ्या बाजूंची आणखी माहिती घेण्यासाठी आपल्या वेबसाईटवरील आणखी काही लिंक सोबत दिल्या आहेत त्या नक्की पहा. आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल. शुभेच्छा
https://letstalksexuality.com/pornography-feminist-critique/