मी 19 वर्षाचा मुलगा आहे. माझे काही प्रश्न . प्लीज answer
- नॉर्मल केस मध्ये आपल्या बायकोसोबत संभोग करताना तिचा नवरा तिच्या योनीत् किती दणके मारतो. (50, 60 100. etc. ). कमीत कमी किती दणके मारलेच पाहिजेत.
- मी मूठ मारताना कॉट वर पालथा झोपून दणके मारतो. पण मी 8-10 पेक्षा जास्त दणके मारू शकत नाही आणि माझी ही method योग्य आहे का?
- खूप वेळ फक्त हलवून, पाणी न काढता थांबले तर लिंगाला काही इजा होते का?
- बाईची योनी किंवा स्तन समजून लोडाला आवळणे, हिसके देणे योग्य आहे का ?
- कुठल्याही मुलीचे अथवा बाईचे स्तन बघून मला ते दाबण्याची खूप इच्छा होते. मी काय करू?
- रस्त्यावर मुली/ महिला जाता येता छाती दाखवत असतात. पण त्यांच्या स्तनांकडे जरा बघितले कि छाती नीट करतात. मग जर बघायचेच नाही तर स्तन कशाला दाखवायचे ?
- हजारो websites अशा आहेत की त्या सांगतात मूठ मारणे वाईट आहे. मग कुणाचे खरे आहे?
याआधी दोन वेळा तुला या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत. तुझी भाषा अजूनही हिंसक आणि अतिशय अपमानकारक आहे. लैंगिकतेबद्दल बोलायचं म्हणजे अशा भाषेतच बोलायचं असा तुझा समज असेल तर तो जितका लवकर शक्य आहे तितका लवकर दूर कर. दुसरं म्हणजे तुझ्या अशा भाषेचा, प्रश्नाचा आम्हाला कणही त्रास होत नाही. त्यामुळे त्या दृष्टीने परत प्रश्न पाठवला असशील तर ते ताबडतोब बंद कर. तू ज्या शब्दांमध्ये प्रश्नांची मांडणी केली आहे त्यामधून तुला खरोखर प्रश्नांची उत्तरे हवी आहेत की इतर काही साध्य करायचं आहे हे स्पष्ट होत नाही. यापेक्षा अधिक चांगल्या शब्दांमध्ये मांडू शकला असता. पण असो. आम्ही अशी अपेक्षा करतो की तुला हे सर्व प्रश्न खरोखरच पडले असावेत आणि त्याची उत्तरे मिळाली तर तुझे शंका निरसन होईल.
तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं परत देत आहोत.
उत्तर क्रं १ :
नॉर्मल केसमध्ये नवरा बायकोबरोबर सेक्स करतो, किंवा लैंगिक संबंध ठेवतो. लैंगिक संबंधांचा एक भाग म्हणून तिच्या योनीमार्गामध्ये लिंग आत सरकवतो. दणके मारायला तो किंवा स्त्रीचं शरीर मशीन नाहीये. सेक्स आकड्यात करायचं नसतं. अमुक आकडे चुंबन घेतलं तर समोरील व्यक्ती उत्तेजित होईल किंवा अमुक अवयवाला ठराविक वेळा हात लावला तर पूर्ण आनंद मिळेल असा हिशेब नसतो. बिछान्यात प्रेम किंवा सेक्स करतात आकडेमोड किंवा हिशोब नाही.
पोर्न काय किंवा इतर फिल्म काय ते सर्व पूर्व नियोजित आणि संकलित केलेलं रेकोर्डिंग असतं. ते सगळं प्रत्यक्षात करता येत नाही मित्रा. ते सगळं पाहून लैंगिक संबंध ठेवायला जाशील तर स्वतःचाही हिरमोड किंवा अपमान करून घेशील आणि एका स्त्रीवर अत्याचार. त्यामुळे या फिल्म पाहून काही तरी आयडिया मनात ठेऊ नको. जर शीघ्रपतनाचा त्रास असेल तर वैद्यकीय मदत किंवा सल्ला घे.
उत्तर क्रं २ :
ही परीक्षा किंवा रेस नाही. लैंगिक आनंद आणि समाधान सोडून किती आणि कमीत कमी किती हे कशाला मोजत बसायचं?
उत्तर क्रं ३ :
हस्तमैथुन करताना वीर्यपतन होण्यापूर्वीच हस्तमैथुन बंद केलं तर काही नुकसान होत नाही. वीर्यकोषात साठवलेलं वीर्य कालांतराने लघवीसोबत बाहेर पडत राहतं. पुरुषाचं शिश्न किंवा लिंग हा एक जिवंत अवयव आहे. मशीन नाही. त्यामुळे अवाजवी अपेक्षाही धरू नकोस आणि वस्तूसारखं वागवू नकोस. आपल्याच शरीराकडे वस्तू, मशीन म्हणून पाहिलं तर त्या शरीरासोबतच मेंदूचंही निश्चितच नुकसान होऊ शकेल. सावध रहा.
उत्तर क्रं ४ :
पुच्ची, गांड हे शब्द सहसा शिव्यांमध्ये येतात आणि म्हणून त्यात एक नकारात्मकता येते. बाईच्या शरीरात योनीमार्ग असतो. इंग्रजीत त्याला व्हजायना म्हणतात. हे शब्द शिकून घे. योग्य काय आणि अयोग्य काय हे प्रत्येकाने स्वतः ठरवायचं. हस्तमैथुन करताना वेगवेगळे लोक वेगवेगळ्या कल्पना करतात. त्यात काय बरोबर आणि काय चूक हे दुसरं कुणी ठरवू शकत नाही. मात्र प्रत्यक्ष संबंधांमध्ये ज्या स्त्रीशी संबंध करशील तिच्या शरीराविषयी आदरच असायला पाहिजे. तिच्या शरीराचा, लैंगिक अवयवांचा उल्लेख असाच करणार असलास तर लैंगिक क्रिया करशील पण त्यातनं समाधान किती मिळेल याबद्दल शंकाच आहे.
मूठ मारणे म्हणजे हस्तमैथुन करणे. ही सुरक्षित लैंगिक कृती आहे. यामुळे कोणतेही लैंगिक आजार पसरत नाहीत. परंतु यामध्ये काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हस्तमैथुन करण्यासाठी इतर काही वस्तूंचा वापर करणार असाल तर त्या वस्तूंची स्वच्छता महत्वाची आहे. तसंच त्या वस्तूंपासून लैंगिक अवयवांना काही इजा तर होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे.
उत्तर क्रं ५ :
मुली या काही उपभोगण्याच्या वस्तू नाहीत. मुलीकडे पाहून लैंगिक भावना मनात येणं वेगळं आणि आपण काय वागतो याचं भान असणं वेगळं. हे भान जात असेल तर आधी सेक्सॉलॉजिस्टला आणि मनोविकार तज्ज्ञांना जाऊन भेट. कारण असं होणं नॉर्मल नाही.
सेक्स ही एकमेकांच्या इच्छेने आणि संमतीने करण्याची गोष्ट आहे. तुझ्या मनात इच्छा झाली म्हणून तू सेक्स करू शकत नाहीस. त्यासाठी तुला जोडीदार पाहिजे आणि ती जोडीदार तिच्या इच्छेनेच सेक्स करेल. अशी जोडीदार नसेल तर हस्तमैथुन कर किंवा लैंगिक इच्छेवर नियंत्रण मिळवता येवू शकतं. तसंच जगात सेक्स एवढीच एक गोष्ट नाहीये.
सेक्सचं व्यसन इतर व्यसनांइतकंच मानसिक आणि शारीरिक आरोग्याला घातक ठरू शकतं. वेळीच स्वतःला आवर. अनावर लैंगिक इच्छेतून स्वतःला आणि दुसऱ्याला इजा करणारे अनेक आहेत. त्यातला अजून एक बनू नकोस.
उत्तर क्रं ६ :
कोणत्याही मुलीला असं वाटत नसतं की तिच्या शरीराकडे बघावं, तिची छेड काढली जावी. तिच्याकडे कोणी आवर्जून बघावं म्हणून त्या छोटे कपडे किंवा शरीर दिसेल असे कपडे घालत नसतात. अगदी जवळचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या घरातल्या मुलींना/महिलांना विचारून बघता येईल. ‘पुरुषांनी बघावं यासाठीच मुली/महिला नटतात किंवा छोटे कपडे घालतात,’ यांसारखे गैरसमज आपल्या पुरुषप्रधान समाजात पसरलेले आढळतात. पण हे फक्त आणि फक्त गैरसमजच आहेत. बाईला उपभोगाची वस्तू समजणाऱ्या पुरुषी मानसिकता असलेल्यांनी ते स्वतःच्या सोयीसाठी, बचावासाठी तयार केलेले आहेत. मुलींच्या छेडछाडीची उत्तरं छोट्या कपड्यांमध्ये, नटण्या-मुरडण्यामध्ये शोधण्यापेक्षा स्त्रीकडे वस्तूच्या स्वरुपात पाहणाऱ्या पुरुषी मानसिकतेत शोधणं गरजेचं आहे. स्त्रीकडे एक ‘माणूस’ म्हणून पाहिलं, स्त्रीत्वाचा आदर केला तर ही मानसिकता नक्कीच बदलू शकते.
उत्तर क्रं ७ :
हस्तमैथुना विषयी अनेक मतमतांतरे आहेत. हस्तमैथून करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. हस्तमैथुन केल्याने पुढे जाऊन मुल होत नाही हाही एक गैरसमज आहे. हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही.
आवाहन
तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने काही प्रमाणात तरी तुमचे शंका निरसन झाले असावे अशी आशा आहे. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावे आणि लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं, प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली आहे. एका वर्षातच आपल्या या वेबसाईटला २ लाखापेक्षा अधिक ‘हिट्स’ मिळाल्या आहेत. शिवाय आपल्या ‘प्रशउत्तरे’ या मंचावर रोज दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. प्रश्नकर्त्याविषयीची गोपनीयता हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपली वेबसाईट लोकप्रिय असण्या मागचे प्रमुख कारण आहे.
तुम्हाला आमचा प्रयत्न उपयोगी वाटतो का? तुम्ही या वेबसाईटबद्दल इतरांना सांगाल का? ही वेबसाईट आणखी चांगली कशी करता येईल? काय नाही आवडलं? या आणि अशा मुद्यांवर तुम्हाला आमच्याशी बोलायला आवडेल का? प्लीज तुम्ही आम्हाला लिहून कळवा किंवा मोबाईलचा वापर करून आपलं मत ऑडिओ किंवा व्हिडीओ रुपात रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता. तुमची ओळख गोपनीय राखली जाईल ही खात्री बाळगा. आपले बहुमूल्य मत आम्हाला tathapi@gmail.com या ई मेल वर जरूर पाठवा.
1mahinyatun sex kiti vela karava??
सेक्स किंवा संभोग ही अशी गोष्ट आहे जी करणाऱ्यांनी ठरवायची असते. किती वेळा, कुणासोबत, केव्हा, कुठे आणि का या ‘क’कार चे काही विशिष्ट उत्तरं किंवा मापदंड नाहीत. हे सेक्स करणाऱ्या व्यक्तींनी मिळून ठरवायचे असतात. मात्र एकत्र येणं म्हणजे फक्त सेक्स करणं असं मात्र वाटायला नको. कधी कधी नुसती सोबतही तितकीच सुखद, आनंददायी असू शकते. दोघेही सज्ञान, दोघांची इच्छा, संमती असणं आणि दोघांनाही सुरक्षित वाटणं मात्र महत्वाचं. मनाचा आवाज ऐका. पण एकट्याच्या नाही…दोघांच्या.