जर असुरक्षित (निरोध शिवाय वा इतर कोणतेही गर्भनिरोधकाशिवाय) संबंध आले असतील तर गर्भधारणा होण्याची शक्यता कधीही नाकारता येत नाही.विर्यपतनाच्या आधी जो पाण्यासारखा द्रव येतो त्याला प्री-कम असे म्हणतात आणि त्यामध्ये सुध्दा पुरुषबीजे असण्याची शक्यता असते आणि या प्री-कममुळेही गर्भधारणा होऊ शकते. अश्या परिस्थिती मध्ये प्री-कम चा संबंध आल्याची शक्यता आहे. त्यामुळे पुरुषबीजे योनीमध्ये आजिबात गेलीच नाहीत असे खात्रीने म्हणता येणार नाही. त्यातील फक्त एक पुरूषबीज गर्भधारणेसाठी पुरेसे असते. त्यामुळे गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही. गर्भधारणा नको असेल तर योग्य ते गर्भनिरोधक वापरणे हाच एकमेव आणि सुरक्षित पर्याय आहे.
गर्भधारणा कशी होते हे समजून घेण्यासाठी खालील लिंक वर भेट द्या.https://letstalksexuality.com/conception/