maje age 32 ahe, kahi vaktigat karnane ajun amhi mul hou dile nhi. pan aata ya age nantar kahi problems hou shakatat ka? mala monthly period made bliding pan far kami ahe. 3 divasat me clear hote. aata chance gyaycha ahe. tar kahi adchani nahi yenar na? please me tumacha ans chi wat bagte ahe.
तुम्ही एकाच प्रश्नात अनेक गोष्टींबद्दल विचारलं आहे. त्यातील प्रत्येक गोष्टींवर सविस्तर चर्चा करु या. प्रथमतः हे समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक स्त्रीचा मासिक पाळी येण्याचा काळ वेगळा असू शकतो. मासिक पाळी २ ते ७ दिवस चालू शकते आणि रक्त जाण्याचं प्रमाण देखील वेगळं असू शकतं. यात घाबरण्याचं काही कारण नाही.(अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://letstalksexuality.com/menstrual-cycle-length/) आता गर्भधारणेविषयी बोलू या. मासिक पाळी चालू झाल्यानंतर अंदाजे १२-१४व्या दिवशी स्त्रीबीज परिपक्व होवून स्त्रीबीजवाहिनीत येतं. या काळात शुक्राणूसोबत स्त्रीबीजाचं मिलन झालं तर गर्भधारणा होण्याची शक्यता असते. (अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://letstalksexuality.com/conception/) आता तुमच्या मुख्य प्रश्नाकडं पाहू या. खरतरं यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर राहिल. इथे सर्वसाधारण माहिती देत आहोत. महिलांचा रजोनिवृत्तीचा काळ सरासरीप्रमाणे वयाच्या ४५वर्षी मानला जातो. काहींचीं रजोनिवृत्ती ४२ला पण येवू शकते तर काहींची ५०व्या वर्षीदेखील. मात्र ३० ते ३२ वयानंतर संप्रेरकांच्या फरकामुळं गर्भधारणेमध्ये अडचणी येवू शकतात किंवा रिक्स वाढत जातात. याचा अर्थ गर्भधारणा होतच नाही असा मात्र नक्कीच नाही. जर तुम्ही चान्स घेवून गर्भधारणा होत नसेल तर प्रत्यक्ष डॉक्टरांना भेटा आणि त्याप्रमाणे उपाय चालू करा.