1 उत्तर
पाळी चुकल्यानंतर साधारण आठवडाभरानंतर अथवा संबंध आल्यानंतर साधारणपणे दोन आठवड्यांनी टेस्ट केलीत तर गर्भधारणा झाली आहे की नाही हे अधिक खात्रीने सांगता येते. गर्भधारणा झाल्यानंतर संबंधित हार्मोन्स तयार होण्यासाठी आणि ते लघवीत दिसण्यासाठी थोडा कालावधी लागतो. घरच्या घरी करता येणारी टेस्ट सकाळी उठल्या उठल्या केलीत तर अधिक योग्य निकाल मिळू शकतो.
आपले उत्तर प्रविष्ट करा