माझ्या लग्नाला एक महिना झाला आहे आणि माझे मिस्टर pregnancy साठी तयार नाही आहेत 1 ते 1.5 वर्षे नको म्हणत आहेत. पण माझा प्रॉब्लेम असा आहे की माझ्या left side overay च ऑपरेशन झालं आहे आणि या ऑपरेशन बद्दल माझ्या मिस्टर ना काही माहिती नाही आहे. त्याचा काही माझ्या pregnancy वर प्रॉब्लेम होईल का? जर प्लॅनिंग केलं तर1 वर्षानंतर मी pregnant राहू शकेल का?
कुटूंब नियोजन हा तुमच्या दोघांचा निर्णय आहे. तेव्हा ऑपरेशन बाबत तुमच्या पतीला सांगणं महत्वाचे आहे. खरं तर निरोध वापरणे हा पर्याय उत्तम आहे, ज्यामुळे तुम्हाला कुठल्याही गोळ्या किंवा इतर साधने वापरायची गरज उरणार नाही.
ऑपरेशन नंतर कुठले गर्भनिरोधनाचे साधन वापरायचे हे त्याच डॉक्टरांना विचारा कारण नक्की का ऑपरेशन केलं व पुढे काय करायला हवं हे तेच योग्य मार्गदर्शन करतील.
गर्भनिरोधके काय काय वापरु शकतो या बाबत अधिक माहितीसाठी पुढिल लिंक पहा.