काळजी करू नका. अनेक पुरुषांना ही समस्या भेडसवते आणि यावर उपायही करता येईल. जोडीदाराची निराशा होणेदेखील स्वाभाविक आहे. त्यामुळे जोडीदाराशी तुमच्या या समस्येविषयी संवाद साधा. योनीमैथुना व्यतिरिक्त लैंगिक सुखाचे इतरही मार्ग आहेत. एकमेकांना शरीराला, लैंगिक अवयवांना स्पर्श केल्याने लैंगिक समाधान मिळू शकते. दोन्ही जोडीदारांनी दोषारोप न करता एकमेकांना समजून घेतलं, सेक्स सोडून एरवीही जवळीक वाढवली, धीर दिला तर त्याचा परिणाम निश्चित चांगला होऊ शकेल.
शीघ्रपतन आणि त्यावरील उपाय याविषयीचे लेख खाली देत आहोत ते वाचा.