Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors

लैंगिकता समजून घेणं आणि त्यावर बोलणं सोपं करुया.

तुम्हाला कुठून सुरुवात करायला आवडेल?

प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे शिकते. तुम्हाला योग्य वाटणारा पर्याय निवडा.

सहजची सत्रे आत्मविश्वासाने घेण्यासाठी

सर्वंकष लैंगिकता शिक्षण तुमच्या वर्गात समाविष्ट करण्यासाठी तयार सत्र आराखडे, प्रशिक्षक मार्गदर्शक आणि इतर साहित्य.
संसाधने पहा
प्रशिक्षकांसाठी

जेव्हा तुमचे मूल प्रश्न विचारते…

कोणत्याही वयातील कठीण प्रश्नांची शांत आणि प्रामाणिकपणे उत्तरं देण्याचे मार्ग – तसंच, 'सहज' (SAHAJ) पालक बनण्यासाठीचं मार्गदर्शक.
उत्तरं शोधा
पालकांसाठी

प्रयासला निनावी प्रश्न विचारा

तुमचं शरीर, भावना, नातेसंबंध आणि सुरक्षित राहणं यांबाबत कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय मिळणारी उत्तरं.
प्रश्न विचारा
तरुणांसाठी

सहज काय आहे?

सहज हा प्रयासने विकसित केलेला, शालेय स्तरावर आधारित, वयानुरूप सर्वंकष लैंगिकता शिक्षण अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम इयत्ता १ ली ते १० वीतील मुलांच्या वयानुसार, विषयांची पुनरावृत्ती करत पुढे जातो आणि परस्परसंबंधित विषयांबद्दल मुलांची ज्ञान, मूल्ये व कौशल्ये विकसित करतो.
नातेसंबंध आणि संवाद
लैंगिक आणि प्रजनन आरोग्य
लैंगिकता आणि लैंगिक वर्तन
आरोग्य आणि स्वास्थ्यासाठीची कौशल्ये
हिंसा आणि सुरक्षितता
मानवी शरीर आणि विकास
लिंगभाव
मूल्ये, हक्क आणि विविधता

बदलाच्या दिशेने

शाळा आणि समुदायांबरोबरची आत्तापर्यंतची वाटचाल
0
सहज अंतर्गत शिकत असलेली मुले व तरुण
0
सहज राबवले जात आहे अशा शाळा आणि वसाहती
0
सहभागी झालेले प्रशिक्षक
0
सहभागी झालेले पालक
0
सहज इतक्या जिल्ह्यांमध्ये राबवले जात आहे

तुम्हाला हे पण पाहायला आवडेल

व्हीडीओज्, पॉडकास्टस्, लेख आणि ब्लॉग्स – मराठी, इंग्रजी आणि हिंदी मध्ये
सर्व साहित्य
व्हीडीओज्

मुलांच्या प्रश्नांनी बुचकळ्यात पाडलंय? इथून सुरुवात करा.

मुलं प्रत्यक्षात विचारत असलेल्या प्रश्नांची प्रामाणिक आणि वयानुरूप योग्य उत्तरं पहा – जी वय, विषय आणि भाषा या अनुसार शोधता येतील.
प्रश्न मुलांचे, उत्तर तुमचे!
वय वर्षे ३ ते ५
“बाळ कुठून आले?”
वय वर्षे ६ ते ८
“माझ्या शरीराचे काही भाग खासगी आहेत असे का म्हणतात?”
वय वर्षे ९ ते ११
“माझे मित्र म्हणतात की ते पॉर्न पाहतात. ते काय असते?”
वय वर्षे १२ ते १४
“कोणीतरी मला लैंगिक स्वरूपाचा फोटो पाठवला. मी तो माझ्या मित्र-मैत्रिणींना फॉरवर्ड करू का?”
वय वर्षे १५ ते १८
“माझी मासिक पाळी वेदनादायक आणि अनियमित आहे. हे सामान्य आहे का?”

सहजबद्दलचे अभिप्राय

"

पाचवीच्या सहजच्या सत्रानंतर काही मुलं-मुली थांबतात. त्यांना खूप काही बोलायचं असतं, विचारायचं असतं, स्वतःचे अनुभव सांगायचे असतात.

एक मुलगी म्हणाली, “या शाळेत शिकते याचा मला अभिमान वाटतो. कारण या महत्त्वाच्या गोष्टी दुसऱ्या कोणत्याच शाळेत शिकवत नाहीत.” दुसरी मुलगी सांगत होती की तिच्या घरात दादा आणि इतर पुरुषांना मासिक पाळीबद्दल फारशी माहिती नाही, म्हणून ती त्यांना याबद्दल सांगते आहे.

शिक्षक
"

“सहजच्या कार्यक्रमातून पालक म्हणून आम्हालाही खूप काही शिकायला मिळालं. मुलांशी वागताना एक गोष्ट आम्हाला प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे आधी मुलांशी जोडून घ्यायचं आणि मग त्यांना काय योग्य, काय अयोग्य हे सांगायचं. म्हणजेच, आधी समजून घ्यायचं आणि मग समजावून सांगायचं.

या कार्यक्रमात मुलांच्या वयानुसार वेगवेगळे विषय घेतले जातात. लैंगिकता शिक्षण म्हणजे फक्त लैंगिक संबंधांबद्दल माहिती देणं, हा आमचा मोठा गैरसमजही या कार्यक्रमामुळे दूर झाला. खरं तर, स्वतःला समजून घेण्यापासून ते इतरांचा आदर करणं, नाती जपणं आणि समाजात वावरताना कसं वागावं हे शिकण्यापर्यंत अनेक गोष्टींचा यात समावेश आहे.”

पालक
"

“सहजचे तास सुरू झाले तेव्हा सुरुवातीला मला वाटायचं, आपण हे सगळं का शिकायचं? पण हळूहळू माझ्या लक्षात आलं की या गोष्टी आपल्या रोजच्या आयुष्यात खूप उपयोगी आहेत आणि माझ्या मनात पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरंही मला सहजमधून मिळत आहेत. त्यामुळे मला सहजचे तास आवडायला लागले.

या तासांमध्ये आम्ही शरीरात होणारे बदल, मासिक पाळी, संवादाचे वेगवेगळे प्रकार, मुलींचे हक्क आणि इतरांशी कसं वागावं अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकलो.”

विद्यार्थी (इयत्ता पाचवी)
"

“पहिलीच्या वर्गात शरीराच्या अवयवांबद्दल शिकवत असताना, सहजच्या सत्रांमधून शिकलेल्या लिंग, योनी, गुदद्वार आणि स्तन यांसारख्या अवयवांचाही उल्लेख केला. तेव्हा कोणालाही लाज वाटली नाही किंवा कुजबुज झाली नाही.”

शिक्षक
"

“मुलांशी अशा विषयांवर बोलणं किती महत्त्वाचं आहे, याची आम्हाला आधी कल्पनाच नव्हती. सहज कार्यक्रमामुळे मुलांना या संवादाची किती गरज आहे आणि पालक म्हणून आपणही अशा विषयांवर त्यांच्याशी सहजपणे बोलणं किती आवश्यक आहे, हे आम्हाला समजलं. आम्हाला असं वाटतं की सहज हा केवळ एक-दोन वर्षं राबवण्याचा कार्यक्रम नसावा, तर शालेय अभ्यासक्रमाचा एक महत्त्वाचा भाग असावा. म्हणजे प्रत्येक मुलाला शाळेच्या संपूर्ण प्रवासात या शिक्षणाचा फायदा होईल.”

पालक

आमच्या कामाशी जोडलेले राहा

प्रयासमध्ये सुरू असलेल्या कामाबद्दल, नव्या घडामोडींबद्दल आणि नवीन संसाधनांविषयी माहिती ईमेलद्वारे मिळवण्यासाठी आपला ईमेल नोंदवा.