1 उत्तर
स्त्रीच्या पाळीचक्राच्या जननक्षम काळात म्हणजे जेव्हा गर्भधारणा होऊ शकते अशा काळात जर गर्भनिरोधक न वापरता जर लैंगिक संबंध केले असतील किंवा निरोध वापरूनही तो फाटला किंवा फेल गेला तर गर्भधारणेची शक्यता असते. अशा वेळी असे संबंध आल्यानंतर 72 तासाच्या आत जर या गोळ्या घेतल्या तर गर्भधारणा रोखता येऊ शकते. यांना मॉर्निंग आफ्टर पिल्स असंही म्हणतात. मात्र यांच्या नावाप्रमाणे या इमर्जन्सी असतानाच म्हणजेच जेव्हा दुसरा काही उपाय नाही तेव्हाच वापराव्यात. नियमित गर्भनिरोधक म्हणून याचा उपयोग करणं चांगलं नाही.
आपले उत्तर प्रविष्ट करा
योनीच्या बाहेर विर्य सोडले तर गर्भधारणा होती का
सेक्स किंवा संभोग करताना वीर्यस्खलनाच्या वेळी वीर्य योनीबाहेर बाहेर सोडले तरीही वीर्य योनीमध्ये आजिबात जाणारच नाही असे खात्रीने म्हणता येणार नाही. एका वीर्यस्खलनामध्ये लाखो पुरूषबीजं असतात आणि त्यातील फक्त एक पुरूषबीज गर्भधारणेसाठी पुरेसे असते. वीर्य हा पातळ पदार्थ आहे. तसंच पुरूषबीजांना स्वतःची गती देखील असते. त्यामुळे जर स्त्रीच्या पाळीचक्राच्या जननक्षम काळात सेक्स केला तर गर्भधारणेची शक्यता नाकारता येत नाही. गर्भधारणा नको असेल तर योग्य ते गर्भनिरोधक वापरणे हाच एकमेव आणि सुरक्षित पर्याय आहे. गर्भधारणा आणि गर्भ निरोधाकांविषयी अधिक माहितीसाठी या लिंक वरील लेख वाचा. https://letstalksexuality.com/conception/ https://letstalksexuality.com/contraception/