सेक्स आणि हस्तमैथुन दोन्ही आनंद देणाऱ्या क्रिया आहे. सेक्स करताना आपला जोडीदार आपल्या सोबत असतो. हस्तमैथुनामध्ये आपण स्वप्नातल्या जोडीदारासोबत सेक्स करतो. पण या दोन्ही क्रियांमध्ये सुरक्षितता महत्वाची आहे.
हस्तमैथुन करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुन केल्याने पुढे जाऊन मुल होत नाही, लिंग वाकडे होते, वीर्य वाया जातं हे सर्व गैरसमज आहेत. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही. फक्त स्वच्छता नक्कीच महत्वाची…
सेक्समध्ये मात्र जोडीदाराची समंती, विश्वास, आदर, जबाबदारी, आणि सुरक्षितता महत्वाची आहे. नको असलेली गर्भधारणा आणि लिंगसांसर्गिक आजार होऊ नये म्हणून सेक्स करत असताना कंडोमच वापर आवश्यक आहे.
सेक्स आणि हस्तमैथुन दोन्हीही हेल्दी आहेत. निर्णय तुमचा…
हस्तमैथुनाविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंक पाहा.
https://letstalksexuality.com/masterbation_safe_pleasurable/
सेक्सविषयी अधिक माहितीसाठी वेबसाईट वरील ‘सेक्स बोले तो’ सेक्शन वाचा.
https://letstalksexuality.com/category/talking-about-sex/
आपल्या वेबसाईटवर यासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे. ‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/
प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/