लवकर वीर्यस्खलन होण्याची अनेक कारणं असू शकतात. लैंगिक इच्छा वाढवण्यासाठी किंवा त्या नावाखाली बाजारात अनेक औषधं उपलब्ध आहेत परंतु कोणतेही औषध घेण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगले. आता तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे वळूयात.
सर्व प्रथम म्हणजे वयोमानानुसार लैंगिक इच्छा कमी होऊ शकतात ज्याचा परिणाम म्हणून लिंगाच्या नसा ढिल्या होणे किंवा लवकर वीर्यस्खलन होणे अशा गोष्टी होऊ शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लैंगिक समागमाच्या वेळी आपली मानसिक अवस्था कशी आहे त्यावरही लिंगाचा ताठरपणा किंवा वीर्यस्खलनाचा कालावधी अवलंबून असू शकतो. आजच्या धकाधकीच्या काळात, जिथे आपल्यावर अनेक गोष्टींचा दबाव असतो, आपली मानसिक अस्वस्थता आपल्या पर्सनल व प्रायवेट गोष्टींवर खूप प्रभाव टाकत असते ज्यातील एक भाग म्हणजे आपण आपल्या पार्टनरबरोबर कशा पद्धतीने वागतो. त्यामुळे सर्वात प्रथम आपण या समस्येबद्दल आपल्या पार्टनरला विश्वासात घ्या, त्यांच्याशी बोला व असं होण्याची कारणे आपल्या नात्यात आलेल्या तणावात आहेत का? याचा मागोवा घ्या. दुसरं म्हणजे सेक्स म्हणजे केवळ योनी मध्ये लिंग घालणे नाही आहे. सेक्स च्या अगोदर जो फोरप्ले असतो तोही तितकाच महत्वाचा असतो. त्यातून आपण एकमेकांबद्दल, एकमेकांच्या शरीराबद्दल खूप गोष्टी जाणू शकतो शिवाय एकमेकांच्या शरीरातील कोणते भाग संवेदनशील आहेत, कोणत्या भागांमुळे आपल्या लैंगिक भावना तीव्र होतात या गोष्टी जाणून घेण्यासाठी फोरप्ले अतिशय महत्वाची भूमिका पार पाडतो. त्यामुळे सर्वप्रथम चिंता करणे सोडा, शांत व्हा, आपल्या पार्टनरला विश्वासात घ्या, romantic गोष्टींमध्ये मन रमवा, फोरप्लेवर जोर द्या आणि तरीही जर आपली समस्या दूर होत नसेल तर न लाजता sexologist ची मदत घ्या.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा