प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsSex kasa kraycha?: Sex kasa kraycha? Mulimde sex sati kashi echha nirmam kraychi.

Sex kasa kraycha? Mulimde sex sati kashi echha nirmam kraychi.

1 उत्तर
Answer for Sex kasa kraycha? answered 7 years ago

एखाद्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवताना आदर, संमती आणि सुरक्षितता महत्वाची आहे. लैंगिक संबंध ठेवताना दोघेही सज्ञान (१८ वर्ष पूर्ण) आहेत का? दोघांचीही ठेवढीच इच्छा, ओढ आणि संमती आहे का? लैंगिक संबंध सुरक्षित आहेत का हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. फसवणूक करून, खोटं बोलून, जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो.

सेक्स म्हणजे फक्त संभोग किंवा इंटरकोर्स नाही. त्याआधी एकमेकांना सुखावेल अशा पद्धतीने जवळीक साधणं आणि एकमेकांना छान वाटेल अशा पद्धतीने संवाद साधणं आवश्यक आहे. संभोगाची घाई सेक्समधील आनंद कमी करू शकते. आणि पहिल्यांदा सेक्स करताना सगळ्या गोष्टी तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला जमायलाच पाहिजेत असा आग्रह धरू नका. प्रत्येक व्यक्तीला शरीराच्या विशिष्ट भागाला स्पर्श केल्याने लैंगिक सुख मिळत असतं. अशा शरीराच्या अवयवांना स्पर्श केला पाहिजे. याला प्रणय किंवा फोअरप्ले म्हणतात. किमान पहिली २० मिनिटं फोरप्ले करावा. तसेच ‘फोरप्ले’ मध्ये शिस्निकेला (मूत्रमार्गाच्या वरचा भाग) स्पर्श केल्याने स्त्रीला उत्तेजित होण्यास मदत होते.

पहिल्यांदाच सेक्स करत असाल तर प्रभावी गर्भनिरोधक वापरणं कधीही चांगलं. निरोध किंवा कंडोमचा वापर करा आणि गर्भधारणा किंवा लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारांची भीती मनातून काढून टाका. एकमेकांना उत्तेजित करून संभोग केल्याने तो दोघांसाठीही आनंददायी असू शकतो. लैंगिक ज्ञान, संवाद, निवांत वेळ व कल्पकता या गोष्टी लैंगिक सुखास कारणीभूत ठरतात. अधिक माहितीसाठी कृपया आपल्या वेबसाईट वरील ‘ सेक्स बोले तो ‘ हा सेक्शन वाचा. तुम्हाला सेक्सविषयी सर्व शास्त्रीय माहिती मिळेल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 19 =