लैंगिक संबंधातून पसरणारे आजार वेगवेगळ्या प्रकारच्या जंतुसंसर्गातून पसरतात. जंतू तीन प्रकारचे असतात. जीवाणू (बॅक्टेरिया), विषाणू (व्हायरस) आणि परजीवी (पॅरासाइट).
- जीवाणूंमुळे होणारे संसर्ग – क्लॅमेडिया, गनोरिया, सिफिलिस
- विषाणूंमुळे होणारे संसर्ग – जननेंद्रियांवरील मस किंवा चामखीळ (वॉर्ट) – एचपीव्ही, जननेंद्रियांवरील नागीण (जनायटल हर्पिस), ब व क प्रकारची कावीळ, एचआयव्ही/एड्स
- परजीवींमुळे होणारे संसर्ग – ट्रिक, जांघेतील उवा, खरूज
याशिवाय बॅक्टेरियल व्हॅजिनोसिस आणि कॅण्डिडा या जंतुलागणींमुळे लिंगसांसर्गिक आजारांचा धोका जास्त वाढतो.
स्त्रियांमधली काही सर्वसामान्य लक्षणं
- लघवी करताना वेदना
- लैंगिक संबंधांच्या वेळी दुखणं
- दोन पाळीच्या मध्ये रक्तस्राव, लैंगिक संबंधांच्या वेळी रक्तस्राव
- योनीस्रावाचा रंग बदलणं – पिवळा, हिरवट किंवा लाल रक्तस्राव
- योनीस्रावाला उग्र व घाण वास
- मायांगामध्ये खाज – गुदद्वारातून स्राव
- जननेंद्रियांवर किंवा गुदद्वारावर फोड, पुळ्या, गाठी, व्रण
- ओटीपोटात दुखणं
पुरुषांमधली काही सर्वसामान्य लक्षणं
- लघवीच्या वेळी किंवा लैंगिक संबंधांच्या वेळी वेदना
- लिंगातून किंवा गुदद्वारातून पूसारखा स्राव
- जननेंद्रियांवर किंवा गुदद्वारावर फोड, पुळ्या, गाठी, व्रण
- जांघेमध्ये गाठी येणे, त्या फुटणे किंवा चिघळणे
- एका किंवा दोन्ही वृषणांमध्ये वेदना
लक्षात ठेवा
न घाबरता आणि लाजता डॉक्टरांची किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत घ्या.
इतर आजारांसारखेच हे देखील आजार आहेत आणि त्यांच्यावर उपचारदेखील आहेत.
वेळीच निदान झालं तर बहुतेक लिंगसांसर्गिक आजार बरे होऊ शकतात.
वेळीच उपचार झाले नाही तर मात्र काही आजारांचं घातक रोगांमध्ये रुपांतर होऊ शकतं.
लैंगिक संबंधातून पसरणा
https://letstalksexuality.com/category/sexual-health/
आवाहन
तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने काही प्रमाणात तरी तुमचे शंका निरसन झाले असावे अशी आशा आहे. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावे आणि लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं, प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली आहे. एका वर्षातच आपल्या या वेबसाईटला २ लाखापेक्षा अधिक ‘हिट्स’ मिळाल्या आहेत. शिवाय आपल्या ‘प्रशउत्तरे’ या मंचावर रोज दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. प्रश्नकर्त्याविषयीची गोपनीयता हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपली वेबसाईट लोकप्रिय असण्या मागचे प्रमुख कारण आहे.
तुम्हाला आमचा प्रयत्न उपयोगी वाटतो का? तुम्ही या वेबसाईटबद्दल इतरांना सांगाल का? ही वेबसाईट आणखी चांगली कशी करता येईल? काय नाही आवडलं? या आणि अशा मुद्यांवर तुम्हाला आमच्याशी बोलायला आवडेल का? प्लीज तुम्ही आम्हाला लिहून कळवा किंवा मोबाईलचा वापर करून आपलं मत ऑडिओ किंवा व्हिडीओ रुपात रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता. तुमची ओळख गोपनीय राखली जाईल ही खात्री बाळगा. आपले बहुमूल्य मत आम्हाला tathapi@gmail.com या ई मेल वर अथवा या 9545555670 व्हाट्स अप क्रमांकावर जरूर पाठवा.