sexchi garj ahe asked 7 years ago

2 उत्तर
Answer for sexchi garj ahe answered 7 years ago

सेक्स म्हणजेच लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा होणं, गरज वाटणं स्वाभाविक आहे. पण सेक्स ही एक जबाबदार कृती आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणूनच सेक्स करताना आवश्यक आहे तुमची आणि जोडीदाराची इच्छा, संमती आणि सुरक्षितता. नको असलेली गर्भधारणा आणि लैंगिक संबंधांतून पसरणारे आजार होऊ नयेत यासाठी कंडोमचा वापर आवश्यक.

तुमच्या मनात कदाचित प्रश्न पडला असेल की, जोडीदार नसेल किंवा जोडीदाराची संमती नसेल तर लैंगिक गरज कशी पूर्ण करणार ? अशावेळी तुम्ही हस्तमैथुन करू शकता

हस्तमैथून करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही.

आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.com/frequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 17 =