प्रश्नोत्तरेCategory: Public Questionssex kelya diwasa pasun aplyala kahi infection jhale nahi he pahanya sathi kiti diwasani test karawi? aids chi laxan kay ahet? hi laxan sex kelya nantr kiti diwasani disatat?

sex kelya diwasa pasun aplyala kahi infection jhale nahi he pahanya sathi kiti diwasani test karawi? aids chi laxan kay ahet? hi laxan sex kelya nantr kiti diwasani disatat?

1 उत्तर

एच.आय.व्ही.ची सुरुवातीची लक्षणं खालीलप्रमाणे आहेत.

एचआयव्हीची आधीची लक्षणं साध्या सर्दी-तापासारखी असतात. ताप, अंगदुखी, खोकला, इत्यादी. असुरक्षित संभोगानंतर 3 ते 6 आठवड्याच्या आत पुढील लक्षणं जाणवू लागली तर एचआयव्ही तपासणी करणं गरजेचं आहे.

१. ताप,

२. डोकेदुखी

३. जुलाब

४. अंगावर रॅश / पुरळ

एच.आय.व्ही.ची लागण नसेल तर ही लक्षणं कसल्याही उपचाराशिवाय जाऊ शकतात. मात्र लागण झाली असेल तर ही लक्षणं कित्येक महिने तशीच राहतात. आणि हळूहळू शरीराची प्रतिकार शक्ती नष्ट करतात. यातूनच पुढे एड्स ही अवस्था येते.

एड्सची लक्षणं पुढीलप्रमाणे आहेत.

१. वजनात प्रचंड घट

२. भूक न लागणे

३. सतत जुलाब

४. त्वचेचा कॅन्सर

५. मेंदूज्वर

६. क्षयरोग

निदान कसं करायचं?

एच.आय.व्ही.ची लागण झाल्याची शक्यता वाटत असेल (निरोध न वापरता केलेला संभोग, निर्जंतुक न केलेल्या सुया वापरल्या असतील किंवा अंगात रक्त भरलं असेल) तर रक्ततपासणी करता येते. मात्र त्यासाठी ३ महिने वाट पाहून मग तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो. एच.आय.व्ही.ची लागण झाली असेल तर त्या विषाणूच्या विरोधात शरीरात प्रतिद्रव्ये तयार होतात. संसर्ग झाल्यावर अशी प्रतिद्रव्ये तयार होण्यासाठी किमान २ महिन्याचा काळ जावा लागतो. रक्ताच्या तपासणीमध्ये अशी प्रतिद्रव्ये तयार झाली आहेत का ते पाहिले जाते. ३ महिन्याच्या आधी रक्त तपासणी केली तर ही प्रतिद्रव्ये मिळत नाहीत आणि एच.आय.व्ही झाला असेल तरी त्याची लागण नाही असा रिपोर्ट येतो. यामुळे पुन्हा रक्ताची तपासणी होणं गरजेचं आहे.

उपचार

एच.आय.व्ही.वर कोणताही इलाज नाही. मात्र जीवनशैलीत आवश्यक बदल केले तर एच.आय.व्ही.ची लागण झाल्यानंतरही व्यक्ती संपूर्ण आयुष्य व्यवस्थित राहू शकते. सध्याच्या औषधांमुळे एड्सची अवस्था लांबवता येऊ शकते. या औषधांना अण्टीरेट्रोव्हायरल औषधे म्हणतात. ही औषधं विषाणूची वाढ थोपवतात.

एचआयव्ही होऊ नये म्हणून

लैंगिक संबंधातून लागण टाळण्यासाठी

१. निरोधचा वापर

२. एकाहून अधिक व्यक्तींशी लैंगिक संबंध टाळा. किंवा असे संबंध नेहमी निरोधचा वापर करूनच ठेवा.

३. पुरुषांमध्ये सुंता केल्याने म्हणजेच लिंगाच्या पुढची त्वचा काढून टाकल्याने लिंगसांसर्गिक आजारांची लागण होण्याचा धोका ५० टक्क्यांनी कमी होतो.

४. जननेंद्रियांवर फोड, व्रण, अनियमित स्राव किंवा वेदना असेल तर तपासणी करून घ्या. इतर कोणते लिंगसांसर्गिक आजार असतील तर एचआयव्हीची लागण होण्याचा धोका वाढतो.

५. रक्तातून लागण होऊ नये म्हणून

६. शरीरात रक्त भरताना ते अधिकृत रक्तपेढीतूनच घ्या. रक्ताची एचआयव्ही तपासणी झाली आहे का नाही हे तपासून बघा. रक्ताच्या पिशवीवर त्या रक्तावर केलेल्या सर्व तपासण्यांची नोंद असते.

७. निर्जंतुक न केलेल्या सुयांचा वापर कटाक्षाने टाळा. प्रत्येक वेळी नवीन सुई वापरा.

८. एकमेकांच्या इंजेक्शन्स किंवा सुया वापरू नका. शिरेतून नशा घेणाऱ्या व्यक्तींसाठी हे खास करून महत्त्वाचं आहे.

आईकडून बाळाला लागण होऊ नये म्हणून

१. आईला एच.आय.व्ही. असेल तर गरोदरपणी आणि प्रसूतीच्या वेळी एआरटी औषधे घ्या.

२. प्रसूती शक्यतो सिझेरियन पद्धतीने करा.

हे समजून घ्या

आपल्याला कोणत्याही कारणाने एच.आय.व्ही.चा संसर्ग झाला आहे अशी शंका मनात असल्यास लगेच निदान करून घ्या. एक लक्षात घ्या वेळेवर निदान झालं आणि उपचार सुरू झाले तर एच.आय.व्ही झाला म्हणजे आयुष्य संपत नाही. जर काही काळजी घेतली आणि आपल्या जीवनशैलीत बदल केले तर एच.आय.व्ही असतानाही चांगलं आयुष्य जगण्याच्या शक्यता वाढवता येतात. निरोगी जीवनशैली, वेळेवर आरोग्य तपासणी, पोषक आहार आणि सकारात्मक मानसिकता यामुळे एचआयव्हीसह जीवन चांगलं जगता येऊ शकतं.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 8 =