पिंपल्स, दाढी, मिशा, छाती आणि इतर अंगांवर केस हे सर्व वयात येताना संप्रेरकांच्या (हार्मोन्स) च्या प्रभावामुळे होणारे बदल आहेत. आपल्याकडे हे बदल मुलांमध्ये साधारणपणे १२ व्या वर्षापासूनच दिसायला लागतात. पण प्रत्येक व्यक्तीनुसार हे भिन्न आहे. पिंपल्स वयानुसार निघून जातात. काळजी नको. दाढी मिशा अथवा छातीवर केस कधी कधी उशिरा येऊ शकतात. तुम्ही काळजी करणं सोडा.
दाढी मिशा नाही आल्या तरी फार काही बिघडत नाही. आपल्याकडे दाढी मिशांचा संबंध मर्दानगी, पुरुषत्व ई खोट्या कल्पनांशी लावला जातो. हे खूपच मागास आहे. तुम्ही त्याचे टेन्शन घेऊ नका. तुम्ही जसे आहात तसे छान आहात. पण तरीही तुमच्या मनात कायम ह्या गोष्टी येऊन त्रास होत असेल तर तुमच्या नेहमीच्या डॉक्टरांना जरूर भेटा.
खाली एक लिंक दिली आहे ती जरूर पहा…