प्रश्नोत्तरेsleeping nude/half nude
sleeping nude/half nude asked 9 years ago

Me 24 varshachi mulgi ahe. Me ha prashna kuthe vicharu shakat nahi ani mala hya site cha upyog zala so me ithe vicharat ahe.
Me kadhi kadhi half nude or nude zopte but ek don vela mala mazya mom ne pakadla ani asa punha n karnyachi tambi dili. Tichya mate he asanskrut panach lakshan ahe.
Me kaay karu ani kasa samjau karan mala kadhi kadhi tasa zopaychi iccha hote.

1 उत्तर
Answer for sleeping nude/half nude answered 9 years ago

तुझ्यासारख्या सगळ्यांना मनातल्या गोष्टी बोलता याव्यात आणि शंका निरसन व्हावं असाच या साइटचा उद्देश आहे.
तुझी इच्छा काही विचित्र, असंस्कृत नाही. मात्र आसपासच्या, घरच्यांच्या कल्पनेमध्ये कदाचित बसत नसेल. त्यामुळे आईला आवडलं नसेल तरी तिच्यावर राग धरू नकोस. तिला समजावून सांग, पण जर तिला ते पटलं नाही तर तिला दोष देत राहू नकोस. तुझी आणि इतरांची इच्छा आवड वेगवेगळी असू शकते. एक लक्षात घे, तुझी इच्छा तुझी स्वतःची आहे, त्यात काही गैर, वावगं, चुकीचं नाही. पण ते किती जणांना समजेल, आवडेल, रुचेल ते माहित नाही. त्यामुळे ते आईला किंवा इतरांना पटेल असा प्रयत्न कर, मात्र हट्ट धरू नकोस. यात काही गैर नाही, उलट आतले कपडे घट्ट असले तर त्याचा शरीराला त्रास होऊ शकतो, अशा पद्धतीने तुला तुझी बाजू मांडता येईल. अजून काही सुचलं तर तुला लिहूच.
ऑल द बेस्ट… तू काय तोडगा काढलास ते ऐकायला आम्ही उत्सुक आहोत.

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 10 =