stop masturbation asked 9 years ago

mi khup masturbation krto.
mla he thambvayche ahe.
pn he majhe masturbate krne kse thambvave.

kay krave. v kay kru naye jya mule majhe mn hastmaithuna kde valayla nko

plz help

1 उत्तर
Answer for stop masturbation answered 9 years ago

तुम्हाला स्वतःला हस्तमैथुन करणं थांबवायचं आहे आणि त्याबद्दल तुम्ही जागरुक आहात ही पहिली चांगली गोष्ट. हस्तमैथुन करण्यात वाईट काही नाही मात्र जेव्हा त्याचा अतिरेक होतो, त्यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम व्हायला लागतो तेव्हा त्या व्यसनातून स्वतःला सोडवलेलं कधीही  चांगलं.
हस्तमैथुन कधी करावंसं वाटतं याचा आधी विचार करा. स्वतःला इतर कोणत्या तरी गोष्टीमध्ये गुंतवून घ्या. व्यायम करायला, खेळायला, पळायला किंवा पोहायला जा. व्यायामामुळे शरीर आणि मन दोन्ही ताजंतवानं होतं.
मन वेगळ्या गोष्टीत रमलं की सेक्सचे किंवा हस्तमैथुनाचे विचार कमी व्हायला मदत होते. त्यामुळे एखाद्या गटामध्ये सामील व्हा. सामाजिक कामाची आवड असेल तर तशा एखाद्या कामात सहभाग घ्या. वाचनाची आवड असेल तर लायब्ररीत जाऊन पुस्तकं वाचा. मित्रांबरोबर सहलीला, बाहेर जा. सेक्सविषयी बोलणं, वाचणं, फिल्म इत्यादी पाहणं काही काळ टाळून पहा. हस्तमैथुन करण्याची इच्छा कमी होऊ शकेल.
सुरुवात म्हणून एका दिवसात किती वेळा हस्तमैथुन करता ते कमी करा. चारदा करत असाल तर दोनदाच करा, दोनदा करत असाल तर एकदाच करा. अशा प्रकारे हळू हळू हस्तमैथुनाची सवय कमी होऊ शकेल. जर प्रयत्न करूनही जमत नसेल तर डॉक्टरांची मदत घ्यायला काहीच हरकत नाही.
स्वतःवर विश्वास ठेवा. सेक्स आणि लैंगिक भावनांमध्ये काहीही वाईट नाही. फक्त त्याच्या आहारी जाऊ नका. आणि तुम्ही यात नक्की यशस्वी व्हाल अशी आमची खात्री आहे. तुमचे अनुभव लिहून पाठवा. तुमच्या सारख्या इतर मित्र-मैत्रिणींनाही ते उपयोगी ठरतील.
ऑल द बेस्ट!!!

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 19 =