मुली किंवा स्त्रियांसाठी लैंगिक इच्छा वाढवणाऱ्या औषधांवर सध्या संशोधन सुरू आहे. पुरुषांसाठी जशी व्हियाग्रा आहे तशीच स्त्रियांसाठी एखादी गोळी भविष्यात मिळू शकेल. सध्या तरी अशी प्रमाणित औषधं उपलब्ध नाहीत. तसंंही अशी काही औषधं आली तर ती आजारावर उपाय म्हणून येतात. सहज म्हणून लैंगिक इच्छा वाढवण्यासाठी त्यांचा वापर करायचा नसतो. त्याचे शरीरावर, लैंगिक उत्तेजनेवर आणि संबंधांवर परिणाम होऊ शकतात.
गोळ्या आणि औषधांपेक्षा एकमेकांबद्दल ओढ निर्माण करण्यासाठी अनेक उपाय करता येऊ शकतात. एकमेकांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवणं, एकमेकांना शारीरिक जवळीक देणं, काय केल्याने आपल्या शरीराला आणि मनाला चांगलं वाटतं, लैंगिक आनंद कोणत्या गोष्टीतून मिळतो हे शोधून काढलं तर सेक्स जास्त आनंददायी होऊ शकेल. लैगिक सुख आणि ऑरगॅझमविषयी जाणून घेण्यासाठी पुढील लेख नक्की वाचा.
https://letstalksexuality.com/orgasm/
तसंच स्त्रियांमध्ये क्लिटोरिस हा केवळ लैंगिक आनंद देणारा अवयव आहे त्याविषयी वाचा. मदत होईल.
https://letstalksexuality.com/clitoris-and-orgasm-in-women
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा