प्रश्नोत्तरेveshyshi sambhog kelyas hiv hovu shakto ka

1 उत्तर

असुरक्षित लैंगिक संबंध आजारांना निमंत्रण देतात मग ते कोणीही कोणासोबतही करू देत. सुरक्षित लैंगिक संबंधातून कुठलाही आजार होण्याची किंवा गर्भधारणेची तशी शक्यता नसते. अर्थात कंडोम फाटला किंवा लीक झालेला असेल तर खात्री देता येत नाही.

एड्स हा आजार वेश्याव्यवसायात असणाऱ्या स्त्रीयांमुळे पसरतो असा एक प्रचलित गैरसमज आहे. त्यात कोणाच्या तरी माथी दोष मारून नामानिराळे होण्याची आपल्या पुरुषप्रधान समाजाची मानसिकता दिसते. व्यवसायात असणाऱ्या स्त्रिया नेहमी स्वतःच्या आरोग्याबद्ल काळजी घेत असतात. परंतु त्यांच्याकडे जाणारे ग्राहक अनेकदा कंडोम वापरायला नकार देतात आणि त्यातून आजारांची लागण या स्त्रियांना होते.

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 14 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी