शरीरामध्ये वीर्यनिर्मिती सातत्याने चालू असते. वृषणांमध्ये तयार झालेली पुरुषबीजं आणि प्रोटेस्ट ग्रंथींमधून तयार झालेले स्त्राव वीर्यकोषात साठवले जातात. ज्यावेळी हस्तमथुन किंवा प्रत्यक्ष संभोग होवून वीर्यपतन होतं त्यावेळी वीर्यकोषात असलेलं वीर्य बाहेर पडतं. जर वीर्यपतन झालं नाही तर वीर्यकोष भरल्यानंतर आपोआप लिगांतून वीर्य बाहेर येतं. तुम्ही जर कमीवेळामध्ये जास्त वीर्यपतन करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा जितकं वीर्य शरीरामध्ये तयार झालेलं आहे तितकचं बाहेर पडेल. जसं दिवसातून २ वेळा हस्तमैथुन केलं तर दुसर्याहवेळेस कमी वीर्य बाहेर येईल. मात्र दोन दिवसांनी हस्तमैथुन केलं तर जास्त वीर्य बाहेर येईल. त्यामुळं वीर्य कमी येणं स्वाभाविक आहे जर जास्तवेळा वीर्यपतन होत असेल तर. त्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही. हस्तमैथुनाची वारंवारता(फ्रेक्वेन्सी) कमी जास्त करुन पहा. तुम्हाला अंदाज येईल.
दुसरं महत्वाचं वीर्य वाढवण्याची बाजारामध्ये उपलबध असलेली औषधी नक्की किती फायदेशीर आहेत याबद्दल शंका आहे. अशी औषधं शरीरावर काय दुष्परिणाम करतील याचा अंदाज नाही. पुरुषांच्या शरीरामध्ये नैसर्गिक पध्दतीने वीर्यनिर्मिती होत असते.
माहित असावं:
शिश्नाच्या खालील बाजूस वृषण असते. या वृषणामध्ये दोन बीजकोष असतात. पोटात जिथे मूत्राशय असतं, त्याच्या मागच्या बाजूला दोन वीर्यकोष असतात. बीजकोषात पुरुषबीजं तयार होतात. पुरुषबीजं बीजकोषातून बाहेर पडून बीजवाहक नलिकेतून वीर्यकोषात जातात. वीर्यकोष व त्याच्या शेजारील प्रोस्टेट ग्रंथीमधून वेगवेगळे स्त्राव स्त्रवतात आणि ते वीर्यकोषात साठेवले जातात. त्यात एक चिकट पांढरा पदार्थ तयार व्हायला लागतो त्यालाच वीर्य असे म्हणतात. तयार झालेले वीर्य शिश्नातून बाहेर पडते. शरीरामध्ये वीर्यनिर्मिती सातत्याने चालू असते. वीर्यामध्ये शुक्राणू आणि इतर घटक पदार्थ असतात. शुक्राणूंच्या निर्मितीसाठी शरिराच्या तापमानापेक्षा कमी तापमानाची गरज असते. त्यामुळे वृषण शरीरापासून थोडे वेगळे असतात. बीजकोष हे जास्त संवेदनशील असतात. जेव्हा बीजकोषाजवळील तापमान थंड असते, त्यावेळेस वृषण आकुंचन पावतात, तर जेव्हा तापमान जास्त असते त्यावेळेस वृषण प्रसरण पावतात. कारण शुक्राणू तयार होण्यासाठी बीजकोषाला एका विशिष्ट तापमानाची गरज असते.