प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमुलींना सेक्स करताना सगळ्यात जास्त काय करावेसे वाटते ज्याने त्यांना जास्त आंनद होतो?
1 उत्तर

सेक्स किंवा खरं तर अशी कोणतीच क्रिया नाही ज्याच्यामध्ये सगळ्यांच्या आवडीनिवडी सारख्या असतील. प्रत्येक व्यक्तीला कशाने छान वाटतं हे त्या व्यक्तीलाच माहित असतं. त्यामुळे सगळ्याच मुलींना सेक्समध्ये कशात आनंद मिळेल असं सरसकट उत्तर देणं अवघड आहे. तरीही मुलींना कशात आनंद मिळतो हे तुम्हाला जाणून घ्यायचंय म्हणजे तुम्ही एक चांगले/चांगल्या जोडीदार आहात हे नक्की.
सेक्स किंवा प्रेम ही दोघांनी मिळून करण्याची गोष्ट आहे. त्यामध्ये एकमेकांचा, एकमेकांच्या आवडी-निवडींचा विचार महत्त्वाचा आहे. त्याबद्दल बोलायला पाहिजे, मतांचा आदर ठेवायला पाहिजे. ज्या गोष्टींचा त्रास होतो त्या टाळायला पाहिजेत. सेक्समध्ये आनंद मिळवायचा असेल तर हे आवश्यक आहे.
स्त्रीच्या शरीरात अनेक अशा जागा आहेत, जिथे हळुवार स्पर्श केल्याने लैंगिक उत्तेजना मिळू शकते. संभोगाच्या आधी हळुवारपणे शरीराला स्पर्श करणे, एकमेकांचा सहवास सुखाचा वाटेल अशा रितीने संवाद साधणे आणि जेव्हा संभोगासाठी मनाची आणि शरीराची तयारी होईल तेव्हा संभोग करणे या सुखकर संबंधांसाठी आवश्यक बाबी आहेत. स्तनांना स्पर्श केल्याने तसंच स्त्रीच्या योनीमार्गाच्या वर असणाऱ्या क्लिटोरिस या अवयवाला स्पर्श केल्याने लैंगिक उत्तेजना निर्माण होऊ शकते. बाकी गोष्टी तुमच्या तुम्ही शोधून काढा. त्यात जास्त मजा येईल.
एक गोष्ट मात्र नक्की. आपण केवळ सेक्स करण्यासाठी वापरलं जाणारं, जोडीदाराची शारीरिक गरज भागवणारं शरीर आहोत, आपल्या भावभावनांचा, सुखाचा विचार सेक्समध्ये नाही अशी भावना मुलींच्या मनात येत असेल तर ते त्यांना नक्कीच आवडणार नाही. मर्जीविरुद्ध, जोडीदाराला इच्छा झाली म्हणून सेक्सची जबरदस्ती मुलींना आवडणार नाही. किंवा एखाद्या फिल्ममध्ये पाहिलेली क्रिया मर्जीविरुद्ध करायला मुलींना आवडेल असंही वाटत नाही. आणि हेच सगळं पुरुषाच्या  बाबतीतही तितकंच खरं आहे. अनेक मुलांना असं वाटतं की जोपर्यंत मुलीच्या डोळ्यात पाणी येत नाही तोपर्यंत तिला आनंद मिळत नाही. असले समज डोक्यातून काढून टाका.
प्रेमाची पुढची पायरी म्हणून किंवा निव्वळ शारीरिक ओढीसाठीही सेक्स केलं जातं. एकमेकांशी बोला, कशाने सुख मिळतंय आणि कशाचा त्रास होतोय ते शोधा, तुमचं उत्तर तुम्हाला नक्की सापडेल.
 

pravin shankar bhalerao replied 9 years ago

yes

gautam replied 9 years ago

Yes

VINOD replied 8 years ago

Great sujjetion

ganesh replied 8 years ago

nice

Digambar jadhav replied 8 years ago

मस्त

Pranali Suratkar replied 8 years ago

महिलांच्या योनीत दाना कोठे असतो?

I सोच replied 8 years ago

स्त्रियांमध्ये क्लिटोरिस हा एक निव्वळ लैंगिक अवयव आहे. मायांगातील विविध भागांचा मिळून हा अवयव बनलेला आहे. संपूर्ण योनीमध्ये हा अवयव सामावलेला आहे. असा काही अवयव स्त्रीच्या शरीरात असतो हेच अनेकांना माहित नसतं. मात्र शरीरशास्त्राच्या पुस्तकांमध्येही बहुतेक वेळा तो दाखवलेला नसतो. आणि दाखवला असेलच तर एक छोटासा उंचवटा म्हणून दाखवलेला असतो. ग्रामीण भागात याला दाणा, टिटनी किंवा बटण म्हणलं जातं. पण या सगळ्याचा अर्थ संवेदनशील टोक इतकाच आहे. प्रत्यक्षात मात्र क्लिटोरिस संपूर्ण मायांगामध्ये पसरलेलं आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंक वरील लेख वाचा https://letstalksexuality.com/clitoris-and-orgasm-in-women/

yash replied 8 years ago

महिला नाभीला केलेल्या स्पर्शाने उत्तेजित होतात का?

suman ladda replied 8 years ago

मस्त आहे

suman ladda replied 8 years ago

मस्त आहे

ashish kudale replied 8 years ago

मुलीच्या तोंडात किंवा गांडीत वीर्य गळल्यानंतर ती प्रेगनेन्ट राहते का ?

I सोच replied 8 years ago

महिला नाभीला केलेल्या स्पर्शाने उत्तेजित होऊ शकतात. प्रत्येक व्यक्तीचे काही ‘इरॉटिक पॉइंटस’ असतात. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला शरीराच्या विशिष्ट भागाला स्पर्श केल्याने लैंगिक सुख मिळत असतं. अशा शरीराच्या अवयवांना स्पर्श केला पाहिजे. याला प्रणय किंवा फोअरप्ले म्हणतात. आपल्या जोडीदाराला कोणत्या अवयवांना स्पर्श केल्याने किंवा कोणत्या लैंगिक कृतीतून सुख मिळते याविषयी संवाद साधा. संभोगाची घाई सेक्समधील आनंद कमी करू शकते. किमान पहिली २० मिनिटं फोरप्ले करावा. तसेच ‘फोरप्ले’ मध्ये शिस्निकेला (मूत्रमार्गाच्या वरचा भाग) स्पर्श केल्याने स्त्रीला उत्तेजित होण्यास मदत होते. एकमेकांना उत्तेजित करून संभोग केल्याने तो दोघांसाठीही आनंददायी असू शकतो. लैंगिक ज्ञान, संवाद, निवांत वेळ व कल्पकता या गोष्टी लैंगिक सुखास कारणीभूत ठरतात.

I सोच replied 8 years ago

नाही… मुखमैथुन किंवा गुदमैथुन यामुळे गर्भधारणा होत नाही. गर्भधारणा नक्की कशी होते हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवरील लेख वाचा.
https://letstalksexuality.com/conception/

Sudhir replied 2 years ago

I’m boy

let's talk sexuality replied 2 years ago

तुम्ही मुलगा आहात ते कळालं, पण प्रश्न काय आहे तो समजला नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 7 =