सेक्स किंवा खरं तर अशी कोणतीच क्रिया नाही ज्याच्यामध्ये सगळ्यांच्या आवडीनिवडी सारख्या असतील. प्रत्येक व्यक्तीला कशाने छान वाटतं हे त्या व्यक्तीलाच माहित असतं. त्यामुळे सगळ्याच मुलींना सेक्समध्ये कशात आनंद मिळेल असं सरसकट उत्तर देणं अवघड आहे. तरीही मुलींना कशात आनंद मिळतो हे तुम्हाला जाणून घ्यायचंय म्हणजे तुम्ही एक चांगले/चांगल्या जोडीदार आहात हे नक्की.
सेक्स किंवा प्रेम ही दोघांनी मिळून करण्याची गोष्ट आहे. त्यामध्ये एकमेकांचा, एकमेकांच्या आवडी-निवडींचा विचार महत्त्वाचा आहे. त्याबद्दल बोलायला पाहिजे, मतांचा आदर ठेवायला पाहिजे. ज्या गोष्टींचा त्रास होतो त्या टाळायला पाहिजेत. सेक्समध्ये आनंद मिळवायचा असेल तर हे आवश्यक आहे.
स्त्रीच्या शरीरात अनेक अशा जागा आहेत, जिथे हळुवार स्पर्श केल्याने लैंगिक उत्तेजना मिळू शकते. संभोगाच्या आधी हळुवारपणे शरीराला स्पर्श करणे, एकमेकांचा सहवास सुखाचा वाटेल अशा रितीने संवाद साधणे आणि जेव्हा संभोगासाठी मनाची आणि शरीराची तयारी होईल तेव्हा संभोग करणे या सुखकर संबंधांसाठी आवश्यक बाबी आहेत. स्तनांना स्पर्श केल्याने तसंच स्त्रीच्या योनीमार्गाच्या वर असणाऱ्या क्लिटोरिस या अवयवाला स्पर्श केल्याने लैंगिक उत्तेजना निर्माण होऊ शकते. बाकी गोष्टी तुमच्या तुम्ही शोधून काढा. त्यात जास्त मजा येईल.
एक गोष्ट मात्र नक्की. आपण केवळ सेक्स करण्यासाठी वापरलं जाणारं, जोडीदाराची शारीरिक गरज भागवणारं शरीर आहोत, आपल्या भावभावनांचा, सुखाचा विचार सेक्समध्ये नाही अशी भावना मुलींच्या मनात येत असेल तर ते त्यांना नक्कीच आवडणार नाही. मर्जीविरुद्ध, जोडीदाराला इच्छा झाली म्हणून सेक्सची जबरदस्ती मुलींना आवडणार नाही. किंवा एखाद्या फिल्ममध्ये पाहिलेली क्रिया मर्जीविरुद्ध करायला मुलींना आवडेल असंही वाटत नाही. आणि हेच सगळं पुरुषाच्या बाबतीतही तितकंच खरं आहे. अनेक मुलांना असं वाटतं की जोपर्यंत मुलीच्या डोळ्यात पाणी येत नाही तोपर्यंत तिला आनंद मिळत नाही. असले समज डोक्यातून काढून टाका.
प्रेमाची पुढची पायरी म्हणून किंवा निव्वळ शारीरिक ओढीसाठीही सेक्स केलं जातं. एकमेकांशी बोला, कशाने सुख मिळतंय आणि कशाचा त्रास होतोय ते शोधा, तुमचं उत्तर तुम्हाला नक्की सापडेल.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा
yes
Yes
Great sujjetion
nice
मस्त
महिलांच्या योनीत दाना कोठे असतो?
महिला नाभीला केलेल्या स्पर्शाने उत्तेजित होतात का?
मस्त आहे
मस्त आहे
मुलीच्या तोंडात किंवा गांडीत वीर्य गळल्यानंतर ती प्रेगनेन्ट राहते का ?
I’m boy
तुम्ही मुलगा आहात ते कळालं, पण प्रश्न काय आहे तो समजला नाही.