प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsWithout marrige sex karn bekaydeshir ahe ka??

Lagnaadhi sex karn bekaydeshir ahe ka? ani jar nsel tr asa konta Bhartiy Kayda ahe ka jyat lagnadhi 18 varshavril mule-muli sex kru shaktat? jenekrun tyana tya kaydacha vapar krta yeil …..Karn ajkal lagnadhi openly relation thevne samajala many nahit…. Tr tyasathi konta kayda ahe ka?

1 उत्तर

लग्नाआधी १८ वर्षांवरील व्यक्तींनी लैंगिक संबंध ठेवणे बेकायदेशीर नाही. भारतामध्ये आणि भारतासारख्या अनेक देशांमध्ये लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवण्यास सामाजिक मान्यता नाही. भारतामध्ये अनेक जण लग्नाआधीचे लैंगिक संबंध अनैतिक मानतात पण कायद्याने तो गुन्हा नाही.

लग्नाआधी किंवा लग्नानंतर हे शब्द कायद्यात नाहीत पण शरीर संबंधासाठी संमती वयाचा उल्लेख कायद्यात आहेत. संमती वय म्हणजेच एखादी व्यक्ती संमती देण्यास कायदेशीररीत्या पात्र असते ते वय. भारतीय दंड विधान, सेक्शन ३७५ आणि पोक्सो गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट या कायद्यांमध्ये संमती वय १८ आहे असे नमूद केले आहे. कोणताही कायदा लग्नाआधीचे लैंगिक संबंध गुन्हा आहे असे मानत नाही मात्र परस्पर संमती आणि दोघांचे वय १८ वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. मात्र ही संमती स्वेच्छेने आणि कोणत्याही दबावाशिवाय असणे आवश्यक आहे.

लग्नाआधी लैंगिक संबंध हा गुन्हा कधी ठरतो?

१. लैंगिक संबंध सार्वजनिक ठिकाणी प्रस्थापित केले तर

२. दोघेही किंवा दोघांपैकी एक प्रौढ (१८ वर्षे पूर्ण) नसेल तर

३. मुलीची आणि स्त्रीची आणि संमती तिच्या इच्छेविरुद्ध किंवा जबरदस्तीने मिळविली तर

४. मुलीची संमती असेल पण ती १८ वर्षाखालील असेल तर

५. एखादा पुरुष तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवतो आणि नंतर लग्न करण्याचे वचन मोडतो तेव्हा

थोडक्यात, भारतीय कायद्यानुसार १८ वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तींनी परस्पर संमतीने लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवणे कायदेशीर आहे. नको असलेली गर्भधारणा आणि लैंगिक संबंधांतून पसरणारे आजार होऊ नयेत यासाठी योग्य त्या गर्भनिरोधकांचा वापर अवश्य करावा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 1 =