प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsआमचं नविन लग्न झालय. नवरा सतत सेक्स करतो. योनीची खुपच आग होते. काय करु?

1 उत्तर

तुला त्रास होतोय हे स्पष्टपणे नवऱ्याला सांग. लैंगिक संबंधांमध्ये दोघांचाही आनंद तितकाच महत्वाचा आहे. आपल्याला आवडत नसताना, इच्छा नसताना ठेवले गेलेले लैंगिक संबंध ही एकप्रकारची जबरदस्ती आणि लैंगिक हिंसाच आहे. ती गप्प बसून निमुटपणे सहन करू नकोस. लग्न झाले आहे याचा अर्थ नवऱ्याने हवा तसं आणि हवा तेव्हा लैंगिक संबंध ठेवणे असं होत नाही. तुझी इच्छा आणि संमती तितकीच महत्वाची आहे. नवरा तुझं म्हणणं ऐकत नसेल तर एखाद्या जवळच्या व्यक्तीची मदत घे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 15 =