वयात आल्यापासून वीर्यनिर्मिती सतत चालू राहते. साधारण हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला १००० पुरुषबीजं तयार होतात. तयार झालेली पुरुषबीजं साठवण्यासाठी एक वीर्यकोष असतो. वीर्यकोषामध्ये असलेलं वीर्य हस्तमैथुन करुन वीर्यपतन झाल्यावर, संभोगाच्या अत्युच्च क्षणी किंवा वीर्यकोष पूर्ण भरल्यानंतर आपोआप बाहेर पडतं. त्यामुळं तुम्ही किती अंतराने हस्तमैथुन किंवा संभोग करुन वीर्यपतन करता यावर वीर्याचं प्रमाण अवलंबून असतं.
आता वळू या तुमच्या प्रश्नाकडं. कितीवेळा हस्तमैथुन करू शकता याचं साधं उत्तर एवढचं आहे की तुमची मानसिक आणि शारीरिक क्षमता किती आहे? शरीर आणि मन(मेंदू) दोन्हीही जास्त काम केल्यावर थकतात. त्यामुळं जोपर्यंत तुमचं शरीर आणि मन थकत नाही तोपर्यंत तुम्ही हस्तमैथुन किंवा संभोग करु शकता. एकदा हस्तमैथुन करुन वीर्यपतन झाल्यानंतर पुन्हा लिंगामध्ये ताठरता येण्यासाठी काही मिनिटं किंवा तास लागू शकतात. हे नेहमी लक्षात ठेवा, लिंग हा शरीराचा एक अवयव आहे. हस्तमैथुन किंवा संभोग करणं ही तात्पुरत्या स्वरुपात शारीरिक आणि मानसिक थकवा देणारी कृती आहे. जोपर्यंत तुमचं मन आणि शरीर थकत नाही तोपर्यंत तुम्ही हस्तमैथुन आणि संभोग करु शकता.
प्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो,
आजपर्यंत आपण वेबसाईटच्या माध्यमातून संवाद साधला. आता ‘लेट्स सोच- एक नया नजरिया’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला प्रत्यक्ष भेटता येईल. आपणा सर्वांना या कार्यक्रमाचं आग्रहाचं निमंत्रण. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा https://letstalksexuality.com/lets-soch-ek-naya-nazaria/
Palak